logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

बारामती एमआयडीसी- म्हसोबावाडी- बिल्ट ग्राफिक्स कंपनी, आकोलेजवळ पुणे सोलापूर हायवेला जोडणाऱ्या रस्तारूंदीकरणाच्या कामाला मुहूर्त मिळणार तरी कधी ?


पुणे जिल्हा प्रतिनिधी

इंदापूर, बारामती एमआयडीसी ते बिल्ट ग्राफिक्स कंपनी जवळ पुणे सोलापूर हायवेला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा मार्ग म्हणून गेली 15 ते 20 वर्षे झाले परिसरातील नागरिकांकडून सदरच्या रस्त्याच्या रुंदीकरणाची मागणी ही होत आहे,त्याला कारण ठरलं आहे म्हणजे बारामती एमआयडीसी- रुई- सावळ- म्हसोबाचीवाडी- निरगुडे - आकोले मार्ग ते इंदापूर एमआयडीसीला जोडणारा अत्यंत जवळचा रस्ता म्हणून या रस्त्याची ओळख त्यामुळे वाहनधारकांना भिगवणला जाऊन पुणे सोलापूर हायवेला मिळावं लागत आहे इंदापूर, सोलापूर,व इतर पुर्वेकडच्या भागात जाण्यासाठी सदरच्या रस्त्याचा वापर हा पर्यायाने करावा लागत आहे.

तसेच ते अंतर जवळपास ७ किलोमीटरने जास्त असल्यामुळे वाहनधारक हे जवळील पर्यायी मार्गाचा वापर करत आहे, त्यामुळे बारामती एमआयडीसी ते रुई-सावळ - म्हसोबाचीवाडी -निरगुडे- आकोले , (असा मार्ग ) ग्राफिक्स कंपनी जवळ सोलापूर हायवेला जोडणारा रस्ता हा खूपच अरुंद असल्याकारणाने सदरच्या रस्त्यांवरती छोटे- छोटे अपघात हे दररोज घडत असतात तसेच बारामती येथील एमआयडीसी व कॉलेजला इंदापूर तालुक्यातील अकोले, निरगुडे , म्हसोबाचीवाडी व बारामती तालुक्यातील सावळ या गावांमधील कामगारवर्ग व विद्यार्थी हे पर्यायी मार्ग म्हणून सदरच्या रस्त्याने दररोज आपापल्या सोयीनुसार प्रवास करत असतात,

त्यामुळे इंदापूर तालुक्याचे विद्यमान आमदार दत्तात्रय मामा भरणे तसेच बारामती तालुक्याचे विद्यमान आमदार तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि बारामती लोकसभा खासदार सुप्रियाताई सुळे हे विद्यमान लोक प्रतिनिधी सदरच्या रस्ता रुंदीकरणाच्या प्रश्नांबाबत गांभिर्याने लक्ष घालणार आहेत का नाहीत, का? फक्त या भागातील जनतेचा वापर हा मतांपुरताच केला तर जाणार नाही ना? असा प्रश्न आता येथील नागरिंकामधून उपस्थित होऊ लागला आहे, तसेच जनतेचे लोकप्रतिनिधी या नात्याने या प्रश्नांची सोडवणूक व्हावी एवढीच माफक अपेक्षा आता परिसरातील नागरिकांकडून बोलताना व्यक्त होत आहे.

168
12804 views

Comment