सिदखेडराजा तालुक्यातील पिंपळगाव सोनार येथे निकृष्ट दर्जाची भगर
सिदखेडराजा तालुक्यातील पिंपळगाव सोनार येथे उपासाच्या भगरीमधून काल संध्याकाळ पासून नवरात्र देवीचे उपवास सुरू झाले आहे त्यामध्येच काही दुकानदारांनी आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी निकृष्ट दर्जाची भगर आणून पिपळगाव सोनार येथे भोळ्या भाबड्या भक्तांना विकली आहे त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे पिंपळगाव सोनार येथे अनेक पेशंट हे काही खाजगी दवाखान्यात तर काही प्राथमिक आरोग्य केंद्र साखरखेर्डा येथे उपचार घेत आहेत काही पेशंटची प्रकृती खाल्यामुळे त्यांना खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेणे सुरू आहे.