logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

खामगांव शेगांव रोडवर भीषण अपघात ! २ ठार, ३ गंभीर जखमी

काल दुपारी ३.३० वाजताचे दरम्यान खामगांव-शेगांव रोडवरील लासुरा फाट्याजवळ रेतीची वाहतूक करणाऱ्या एका भरधाव टिप्परने ऑटोरीक्षाला जोरदार धडक दिली. अपघात एवढा भीषण होती की, त्यात ऑटोरीक्षाचा चुराडा झाला. या अपघातात एक जण जागीच ठार, तर एकाचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. या अपघातात तीन जण गंभीररित्या जखमी झाले असून, एका वृद्ध महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.प्राप्त माहितीनुसार, एमएच-२८, टी-३७१६ या ऑटोरीक्षाने काही प्रवासी शेगाव येथून खामगावकडे येत होते. त्यावेळी रेतीची वाहतूक करणाऱ्या टिप्परने ऑटोरीक्षाला जबर धडक दिली. या अपघातात ऑटोचालक चंद्रकांत तुळशीराम पाचपोर (४४, रा. सुटाळपुरा) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर, वडाळी येथील शालीग्राम पारस्कर यांचा खामगावातील एका खासगी रुग्णालयात नेताना वाटेतच मृत्यू झाला. अपघातात अजय तायडे (रा. पुणे), विजय आघाव (रा. शेगाव) जखमी आहेत. तर, नर्मदाबाई धनोकार (रा. पळशी बु.) यांची प्रकृती अत्यवस्थ आहे. घटनेनंतर जखमींना तत्काळ खामगाव येथील सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. येथे जखमींवर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर टीप्परचालक घटनास्थळावरुन पसार झाला. घटनास्थळी शेगाव ग्रामीण पोलिस तत्काळ दाखल झाले होते. काही काळ वाहतुक विस्कळीत झाली होती..

147
3572 views

Comment