logo

करमाळा विधानसभेसाठी इच्छुकांची शंभरी होण्याची शक्यता......

करमाळा तालुक्यातील विधानसभेचे वारे वाहत असताना इच्छुकांची यादी ही शंभरीच्या वर जाण्याची शक्यता नाकारताच येत नाही असे वाटत आहे.
आजपर्यंत सर्व पक्षाचे लोक इकडे तिकडे करून आम्हीच पक्षाचे काम करत आहोत असे दर्शवतात पण सद्य परिस्थिती पाहता एकाच गटातील दोन दोन जण इच्छुक असल्याचे दिसून येत असून प्रत्येकाला वाटतंय की उमेदवारी आपल्यालाच मिळावी.
पण तसं पाहता करमाळा तालुक्यातील राजकारणात नवीन नवीन चेहरे समोर येत आहेत.
त्यामुळे सर्वजण फॉर्म भरतील पण माघार कोण घेणार याच्याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागणार आहे व कोण उभारल्याने कुठल्या गटाला जास्त धक्का पोहोचू शकतो याची गणित अजून कळेनासे झाले आहे.
त्यामुळे करमाळा तालुक्यात उमेदवारांची संख्याही शंभरी च्या पण वर जाण्याची दाट शक्यता दिसत आहे.

0
184 views