logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

सातव्यांदा उमेदवारी, रेकॉर्ड पार विजयाची तयारी आमदार मंगल प्रभात लोढा यांचा मलबार हिल विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल

मुंबई, दि. २४ प्रतिनिधी :
मलबार हिल विधानसभा क्षेत्राचे आमदार आणि या क्षेत्रासाठी भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार मंगल प्रभात लोढा यांनी गुरुवार, दि. २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मलबार हिलमधील नागरिक उपस्थित होते. मागील ३० वर्ष मलबार हिल विधानसभा मतदार संघातून मंगल प्रभात लोढा सातत्याने आमदार म्हणून निवडून येत आहेत. "या निवडणुकीत सुद्धा आपण नक्की जिंकू! मलबार हिल विधानसभा मतदारसंघासाठी काम करण्याची संधी पुन्हा एकदा जनता देईल," असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, "मलबार हिल विधानसभा क्षेत्रातील जनता आमच्या सोबत आहे. नक्कीच येथून महायुतीचाच उमेदवार निवडून येईल. मी गेले १० दिवस येथील लोकांना भेटतो आहे आणि या वेळी नागरिकांचा उत्साह कौतुकास्पद आहे. यावेळची निवडणूक मी नाही तर, स्वतःच्या उज्ज्वल भविष्यासाठी जनताच लढणार आहे. सर्वजण आज मोठ्या संख्येने येथे उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो."
दरम्यान, मंगल प्रभात लोढा यांनी मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आणि राज्य सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून देखील मागील दोन वर्षांच्या काळात काम केले आहे.

"मी सातव्यांदा उमेदवारी अर्ज भरत असून, संपूर्ण मलबार हिलमधील जनता यावेळी सुद्धा माझ्या साथीला आहे. इतके वर्ष मला सहकार्य केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. फक्त मलबार हिलमध्येच नाही तर, संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीचे सरकार पुन्हा एकदा येईल!"
मंगल प्रभात लोढा, आमदार, भाजप

138
23474 views

Comment