logo

मंडळ अधिकारी लाटकर यांचा पराक्रम, अवैध वाळुने भरलेले ट्रक्टर पकडून रिकामे केले जमा.




इस्लापूर प्रतिनिधी:-किनवट तालुक्यातील शिवनी येथे दि. १४ ऑक्टोंबर रोजी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पाठिमागे अवैधरीत्या वाळू ट्रक्टर मध्ये भरणे चालू असल्याची माहिती पत्रकार संजय वाठोरे यांनी मंडळ अधिकारी लाटकर यांना दिली,मिळालेल्या माहितीवरून मंडळ अधिकारी व एक सहाय्यक तेथे पोहोचले व अवैध वाळूने भरलेला ट्रक्टर ताब्यात घेण्याचे प्रयत्न केले असता रेती तस्कर जमा झाले व लाटकर यांना घेरून दमदाटी करून ट्रक्टर पळविण्याचा प्रयत्न करू लागले.पत्रकार संजय वाठोरे यांनी माहिती दिल्या मुळे शिवीगाळ करून मारहाण केले.संजय वाठोरे यांनी या संबंधि पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यामुळे हे प्रकरण उघडकीस आले आहे.

१४ऑक्टोंबर रोजी शिवणी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पाठिमागे अवैध वाळू ट्रक्टर मध्ये भरत असल्याचे माहिती मंडळ अधिकारी लाटकर यांना मिळाली कार्यवाही करण्यासाठी एक सहाय्यक सोबत घेऊन ते जाय मोक्यावर पोहचले, मंडळ अधिकारी आल्या मुळे रेती तस्कर गोळा झाले व मंडळ अधिकारी सोबत हुज्जत घालू लागले. थोड्याच वेळात तेथे गावातील लोक जमा झाले व प्रकरण मिटवण्यासाठी प्रयत्न करू लागले.पत्रकार संजय वाठोरे यांनी माहिती दिली म्हणून त्यांना शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. त्यासंबंधी त्यांनी १८ ऑक्टोंबर रोजी इस्लापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार केली आहे.


१४ ऑक्टोंबर रोजी घटना घडली असून २२ऑक्टोंबर रोजी लाटकर यांनी दोन रिकामे ट्रक्टर पोलीस ठाण्यात जमा केल्यामुळे मंडळ अधिकारी यांच्या कार्य शैली वर शंका उपस्थित होत आहे.


चौकटीत
मंडळ अधिकारी लाटकर यांना या संबंधीत माहिती विचारले असता उडवाउडवीचे उत्तर देऊ लागले.

0
5 views