
संविधानचा 75 वा अमृतमहोत्सव केवड गावातून प्रभात फेरी काढत मोठ्या उत्साहात साजरा
*श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ केवड, संचलित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा केवड या प्रशालेमध्ये आज भारतीय संविधान दिनाच्या 75 व्या अमृतमहोत्सव केवड गावातून प्रभात फेरी काढत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला*
या संविधान दिनाच्या निमित्ताने व्यासपीठावर संस्थेचे संस्थापक सचिव महारुद्र मामा चव्हाण संस्थेच्या आधारस्तंभ गणेश चव्हाण व्यवस्थापक कालिदास चव्हाण मुख्याध्यापक नरसेश्वर पाटील शिवाजी शिंदे कमलाकर साखळे हे उपस्थित होते
यावेळी केवड या गावातून प्रशालेतील विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढली विविध घोषणा देत संविधानाचे महत्त्व गावातील लोकांना सांगितले प्रशालेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी आपल्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व संविधानाचे महत्त्व सांगितले त्यानंतर प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांना संविधान दिनानिमित्त खाऊ वाटप करण्यात आला
संस्थेचे आधारस्तंभ गणेश चव्हाण सर यांनी आपल्या भाषणामध्ये आजच्या दिवशी 26 / 11 रोजी मुंबई येथे दहशतवाद्यांनी हल्ला केला होता त्या हल्ल्यामध्ये जवान शहीद झाले होते या वेळी शहिदांना विनम्र अभिवादन करून संविधान दिनाचे महत्त्व हे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले भारत देशावर इंग्रजांनी दीडशे वर्ष राज्य कारभार केला. महापुरूषांच्या बलिदान व त्यागामुळे सरतेशेवटी ब्रिटिशांनी भारताला 'स्वराज्य' देण्याचे मान्य केले. त्यासाठी मात्र भारतानेच भारतासाठी स्वत:चा राज्यकारभार करण्यासाठी राज्यघटना तयार करावी. अशी अट घातली. राज्यघटना निर्मितीचे अवघड असे धनुष्य पंडीत जवाहरलाल नेहरू, डॉ.राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी उचलले. जुलै १९४६ मध्ये घटना समितीसाठी निवडणुका घेण्यात आल्या. त्यानुसार २९६ सदस्यांची घटना समिती अस्तित्वात आली.'स्वतंत्र भारतासाठी घटनानिर्मिती करणे' व 'देशासाठी कायदे करणे', हे दोन प्रमुख उद्देश संविधान सभेचे होते. ११ डिसेंबर १९४६ रोजी डॉ.राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. घटना समितीच्या एकूण ८ समित्या होत्या. या सर्व समित्यांमध्ये ‘मसुदा समिती’ ही प्रधान समिती होती. या समितीचे अध्यक्ष होते डॉ.बाबासाहेब आंबेडकर. मसुदा समितीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर (अध्यक्ष), अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, के.एम.मुन्शी, गोपाल अय्यंगार, एन.माधवराव, मोहम्मद सादुल्ला व डी.सी.खेतान हे सात सदस्य होते. या सात ही सदस्यांपैकी फक्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनानिर्मितीसाठी पूर्णवेळ देऊन राज्यघटनेचा मसुदा तयार केला. *डॉ.बाबासाहेब आंबेडकर व घटनासमितीच्या २ वर्ष ११ महिने १८ दिवसाच्या अथक परिश्रमातून राष्ट्रासाठी घटनेची निर्मिती करण्यात आली. म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना ‘भारतीय घटनेचे शिल्पकार’ असे म्हटले जाते.*
यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थिनी हे मोठ्या उत्साहाने उपस्थित होते