logo

जे. एस. एम. कॉलेज अलिबाग व जे. एस. एस. रायगडच्या माध्यमातून प्लास्टिक बंदी जन जागृती उपक्रम.

*एन.एस.एस चे युवक बनत आहेत देशाचे आधारस्तंभ- "डॉ. विजय कोकणे''*

*"जे.एस.एम कॉलेज अलिबाग व जे.एस.एस रायगडच्या माध्यमातून प्लास्टिक बंदी जन जागृती उपक्रम"*

गुरुवार दिनांक 28 नोव्हेंबर 2024 रोजी नागाव-अलिबाग या ठिकाणी कौशल्य विकास व स्वच्छता उपक्रम आदिंना प्रोत्साहन देण्याच्या उददेशाने राष्ट्रीय सेवा योजना (एन. एस. एस.) विभाग जे.एस.एम कॉलेज अलिबाग व जे. एस. एस. रायगडच्या माध्यमातून "प्लास्टिक बंदी जन जागृती उपक्रम'' राबवण्यात आला सदर उपक्रमाप्रसंगी गावकऱ्यांना व एन.एस.एस स्वयंसेवक यांना ह्या प्रसंगी कागदी व कापडी पिशव्या बनवण्याचे मार्गदर्शन मुख्य मार्गदर्शक डॉ. विजय कोकणे यांच्या माध्यमातून करण्यात आले त्याचबरोबर सहाय्यक प्रशिक्षिका सौ प्रतिक्षा सचिन चव्हाण यांनी उपस्थितांकडून सराव करून घेतला तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ. प्रतिक्षा चव्हाण यांनी केले.

संस्थापक अध्यक्षा डॉ. मेधा किरीट सोमैया, अध्यक्ष डॉ. नितीन गांधी, उपाध्यक्ष सौ रत्नप्रभा बेल्हेकर, संचालक डॉ. विजय कोकणे, जे.एस.एम कॉलेजचे अध्यक्ष डॉ. गौतम पाटील व प्राचार्य डॉ. सोनाली पाटील व व्यवस्थापक मंडळ यांच्या मार्गदर्शनातून भारत सरकारच्या कौशल्य विकास योजने अंर्तर्गत कार्यक्रम राबवित असतांना या प्रसंगी जन शिक्षण संस्थान रायगडचे संचालक डॉ. विजय कोकणे, NSS कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रविण गायकवाड, डॉ. पंकज घरत, प्रा. आश्विनी आठवले, प्रा. जयवंती झावरे व डॉ. अनिल डोंगरे, कर्मचारी सौ प्रतिक्षा चव्हाण (अकाउंट मॅनेजर), हिमांशू भालकर हे कर्मचारी व स्वयंसेवक देखील कार्यक्रम राबवित असतांना उपस्थित होते.

0
12 views