logo

सांगली प्रशासन निरीक्षणगृह व बालगृहातील मुलांच्या सदैव पाठी


प्रशासन निरीक्षणगृह व बालगृहातील मुलांच्या सदैव पाठीशी

- जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी



सांगली, दि. 7, (जि. मा. का.) : निरीक्षणगृह व बालगृहातील मुलांना कोणतीही कमतरता होवू देणार नाही. त्यांना शक्य तितकी मदत करू. या मुलांच्या प्रशासन सदैव पाठीशी राहील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले.

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, सांगली यांचेमार्फत शासकीय / स्वयंसेवी संस्था व शाळांमधील बालकांसाठी कै. दादु काका भिडे मुलांचे निरीक्षण/बालगृह व सौ. सुंदरबाई मालु मुलींचे निरीक्षण गृह/बालगृह, सांगली येथे आयोजित जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सवाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी वर्षा पाटील, बाल कल्याण समिती सांगलीच्या अध्यक्षा निवेदिता ढाकणे, बाल न्याय मंडळाचे सदस्य उदयराव जगदाळे आदी उपस्थित होते.

मुलांनी सदैव आनंदी राहावे, आम्ही सर्वजण आपल्या सोबत आहोत असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, मुलांचे हे शिकण्याचे वय आहे. मनमोकळेपणाने कार्यक्रमात सहभागी होवून चांगली कामगिरी करावी. सर्वांनी मुलांना प्रोत्साहन द्यावे. या महोत्सवाचे अतिशय चांगले व उत्कृष्टपणे नियोजन केल्याबद्दल आयोजकांचे आभार मानून त्यांनी मुलांना शुभेच्छा दिल्या.

प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी गणित प्रदर्शनास भेट देवून बालकांशी संवाद साधला. त्याचबरोबर वाचन क‌ट्टा प्रदर्शनास भेट दिली व दीप प्रज्वलनाने सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी मुलींनी देवीचा जागर हा कार्यक्रम सादर केला.

यावेळी बाल कल्याण समितीचे अध्यक्ष व बाल न्याय मंडळाचे सदस्य, संस्था अधीक्षक, कर्मचारी, कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी, तालुका संरक्षण अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जिल्हा चाईल्ड लाईन यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.






7
9002 views