logo

श्री सिद्धेश्वर विद्यालय, कोलारा येथे राजमाता जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरा

श्री सिद्धेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, कोलारा येथे राजमाता जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरा करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अध्यक्ष वर्ग ९ वी ची मयुरी सोळंकी होती. विद्यार्थी मार्गदर्शक मध्ये राजमाता जिजाऊ वक्ता वर्ग ९ वी ची कु. स्नेहा मघाडे व स्वामी विवेकानंद वक्ता वर्ग ९ वी ची कु. श्रावणी सोळंकी हे होते. प्रमुख उपस्थिती म्हणून विद्यालयाचे प्राचार्य श्री. गणेश नालिंदे, कु. अलका मेथे, जिजाऊंच्या वेशभूषेत कु. वैष्णवी चव्हाण तर स्वामी विवेकानंद यांच्या वेशभूषेत विठ्ठल हरणे इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात विद्येती देवता माँ सरस्वती, राजमाता जिजाऊ आईसाहेब व स्वामी विवेकानंद या महामानवाच्या प्रतिमा पूजनाने झाली. यानंतर विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ आईसाहेब व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या कार्याबद्दल आदर म्हणून वेशभूषा साकारून वैयक्तिक गीत, भाषणाद्वारे व "मी जिजाऊ बोलते" या एकपाठी नाटिकेतून आपले विचार व्यक्त केले. सोबतच जिजाऊंच्या कार्याची थोरवी वर्ग ७ वी च्या चमूने नृत्याच्या माध्यमातुन उत्कृष्टपणे सादर केली. विद्यार्थी मनोगतानंतर कार्यक्रमाच्या विद्यार्थी मार्गदर्शक मध्ये राजमाता जिजाऊ वक्ता कु. स्नेहा मघाडे हिने आपल्या भाषणात राजमाता जिजाऊ यांनी शहाजीराजेचं स्वराज्याचं स्वप्न पुत्र शिवबाच्या मनात पेरलं. नुसतं पेरलं नाही तर सुसंस्कारांच्या अमृतसिंचनाने ते फुलवलं. फुलवून वाढवलं. त्याला दृष्ट लागू नये म्हणून डोळ्यात तेल घालून जीवापाड जपलं. त्याला नवनवी पानं फुलं दिली व हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना मार्गदर्शन केले व आऊसाहेबांच्या विविध उदाहरणे सांगून स्थापत्य कलेचा आदर व्यक्त करून हाच आदर्श मुलींनी घेऊन स्वतःची प्रगती करण्याचे आवाहन केले. यानंतर स्वामी विवेकानंद वक्ता श्रावणी सोळंकी हिने आपल्या मार्गदर्शन भाषणात युगपुरुष स्वामी विवेकानंद यांचे बद्दल मार्गदर्शन करतांना त्यांचे अतिकुशाग्र बुद्धिमत्तेचे वर्णन केले. खूप कमी वेळेत वेद आणि योग यांचा प्रचार जगभर केला. त्यांच्या मते, हिंदू धर्म म्हणजे फक्त पारंपारिक ग्रंथ नसून आखिल मानव जातीने अनुभवलेले आध्यात्मिक परमोच्च शिखर आहे. स्वामी विवेकानंद यांचे भारतासाठी व विश्वासाठी अतुल्य योगदान आहे. त्यांनी तरुणांना विशेष मार्गदर्शन केले. ‘उठा, जागे व्हा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका.’ असा महान संदेश स्वामी विवेकानंद यांनी दिला तो आत्मसात करून त्यांना आदर्श मानून आपले व समाजाचे हित जोपासण्याचे आवाहन केले. प्राचार्य श्री गणेश नालिंदे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात राजमाता जिजाऊसाहेब यांनी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी छत्रपती शिवराय यांना ज्ञानाच्या दुर्य चरित्र संघटना व पराक्रम अशा राजास व सद्गुणाचे बाळकडू पाजले. प्रत्येक पराक्रमी पुरुषाच्या जीवनाचे ध्येय एकच असते ते म्हणजे पारतंत्र्यात असणाऱ्या लोकांना स्वातंत्र्य मिळवून देणे अशी राजमाता ने शिकवण शिवरायांना दिली होती. तसेच युगपुरुष स्वामी विवेकानंद यांचा सुविचार "अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे जोपर्यंत जीवन आहे, तोपर्यंत शिकत रहा." हे सांगून विविध अनुभवातून शिकत राहण्याचा विचार व्यक्त करून सर्व उपस्थितांना राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमाचे आयोजन कु अलका मेथे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग ७ वी चे विद्यार्थी सोहम देशमाने व तुषार बोरसे यांनी तर आभार चेतन म्हस्के यांनी केले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली. कार्यक्रमाला सर्व शिक्षक, प्राध्यापक व कर्मचारी बंधू/ भगिनी उपस्थित होते.

0
550 views