logo

आज देगलूर येथे पोलीस व पत्रकारांचा आज होणार सन्मान



देगलूर
पत्रकार संरक्षण समिती, देगलूरच्या वतीने आज, 19 जानेवारी रोजी सायंकाळी 6:00 वाजता, नगर परिषद कार्यालय परिसरात भव्य सन्मान व कार्यालय उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात पोलिस प्रशासन आणि पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार असून, समितीच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटनही पार पडणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष नांदेडचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार असून, प्रमुख पाहुणे म्हणून नांदेडचे खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण उपस्थित राहणार आहेत. उद्घाटक म्हणून पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे हे उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान कार्यक्रमात "वर्तमान आणि सामाजिक परिघात पत्रकारितेची भूमिका" या विषयावर भागवत तावरे (लोकपत्रकार, बीड) हे मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय, जितेश अंतापूरकर (आमदार, देगलूर-बिलोली), अनुप पाटील (उपविभागीय अधिकारी, देगलूर), मोगलाजी शिरशेटवार (माजी नगराध्यक्ष), लक्ष्मीकांत पदमवार (जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट), व्यंकटराव पाटील गोजेगावकर (माजी सभापती, जि.प. नांदेड), निवृत्ती कांबळे सांगवीकर (माजी जि.प. सदस्य), गंगाधर भांगे (ओबीसी नेते), डॉ. सौ. पूजा सचिन गायकवाड (प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ), तसेच विशेष निमंत्रित म्हणून महेंद्र गायकवाड (जिल्हाध्यक्ष, पत्रकार संरक्षण समिती, नांदेड) आणि शशिकांत गाडे पाटील (सचिव, नांदेड) उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान पत्रकार संरक्षण समितीच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेतले असून, देगलूरसह नांदेड जिल्ह्यातील मान्यवर, पोलिस अधिकारी, पत्रकार, आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.


18
6087 views
  
1 shares