logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

शिक्षणाच्या आयचा घो...?

शिक्षणाच्या बाबतीत सरकारच धोरण म्हणावं तितकं खास नाही,मुलांना शिक्षणात दिलेली सुट,शिक्षकांचा अभाव,मुलांमधे वाढत चाललेला न्यूनगंड,पाहता असे वाटते की शिक्षणाचं महत्व,सध्या असणारी गरज याच थोड ही गांभीर्य मुल आणि पालक यांच्यात दिसून येत नाही.मुलांना शाळेत पाठवण आणि त्याला मागेल ते देणं एवढ्या पुरतेच पालक मर्यादित आहेत या शिवाय आपला मुलगा काय करतो त्याची शाळेतील वर्तणूक कशी आहे,तो अभ्यासात कसा आहे याच्याशी पालकांचं काहीच देणंघेणं नाही,आणि शिक्षक तर फक्त आठ तास डुटी आणि महिण्यकाठी मिळणारा पगार एवढीच मानसिकता घेऊन शाळेत येतात?शहरापासून खेड्यांपर्यंत सर्वजण एका वेगळ्याच प्रवाहाने जात असताना दिसत आहेत,जात ,धर्म ,कर्मकांड,या गोष्टींकडे तरुण पिढी आकर्षित झालेली दिसून येत आहे,हे असच चालू राहील तर देशाचं भविष्य नक्कीच धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. जय शिवराय, जय भारत,

98
8847 views

Comment