सोशल मीडिया व्हायरल सुंदरी मोनालिसाला कुंभमेळयातुन उचलून नेण्याची धमकी.
प्रयागराज : महाकुंभमध्ये अनेकजण चर्चेच्या झोतात येतच असतात. मग त्यात साध्वी असो किंवा मग नागासाधू, प्रत्येकांची वेगळी वेगळी कहाणी आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे होणाऱ्या जगप्रसिद्ध महाकुंभसाठी कोट्यावधी लोक जमले आहेत. परंतु सोशल मीडियावर एकाच चर्चा आहे ती म्हणजे निळ्या डोळ्यांच्या सुंदर तरुणीं मोनालिसाची.
ही तरूणी इंदौर मधून रूद्राक्ष माळा विकण्यासाठी प्रयागराज येथे आली आहे. परंतु मोनालिसाचा व्हिडीओ सोशल मीडियावर इतका जोरदार व्हायरल झाला की मोनालिसाला पाहण्यासाठी आणि तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी लोकांची गर्दी जमू लागली त्यामुळे तिला रूद्राक्ष माळा विकणे कठीण होऊन गेले आहे कमाईवर परिणाम होत आहे त्यामुळे तिच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाहचा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे तसेच तिला महाकुंभ मधून उचलून नेण्याची धमकी सुध्दा मिळाली आहे.
त्यामुळे मोनालिसाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना तिच्या सुरक्षिततेकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे.