logo

75वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा



सांगवी नांदेड येथील क्युरिओसिटी प्री प्रायमरी स्कूल येथे 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला, यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे तथा भारतीय संविधानाच्या पुस्तिकेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर शाळेचे संचालक प्राध्यापक माधव खिल्लारे व संचालिका सौ.अशा खिल्लारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, यावेळी त्यांनी सर्वांना 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. कु सेजल कुलते व कोरिओग्राफर जाधव मॅडम यांनी देशभक्तीपर गीतावर नृत्य करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यानंतर विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या वेशभूषेत विविध कलागुण सादर केले. शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध शालेय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक कीट बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यावेळी नितीन पाथरकर, गोविंद गजभारे, गजानन भोपाळे, मिलन जैन,विद्या कसबे, मनीषा जोंधळे, सौ गायकवाड आदींची उपस्थिती होती

69
9685 views