logo

"सिक्के, संस्कृती एवं इतिहास के दिलबर है शेख दिलावर" . - अशोक सिंह ठाकुर.

नागपूर :- येथे २५ जानेवारी २०२५ रोजी भव्य नाणी प्रदर्शन सोहळ्याचे सुंदर आयोजन रामगोपाल माहेश्वरी सभागृह, सीताबर्डी, नागपूर येथे करण्यात आले. या छान कार्यक्रमाचा कालावधी २४ जानेवारी ते २६ जानेवारी हा होता. या वेळी सर्व इतिहास व नाणे प्रेमींनी आपापले ( ओल्ड कॉइंस डिस्प्ले ) त्याठिकाणी सजवले होते. या प्रदर्शनामध्ये नाण्यांची खरेदी - विक्री सुद्धा सुरू होती. नाणेतज्ञांच्या म्हणन्याप्रमाणे जगभरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोन्याच्या होन नाणी फक्त सहा ते सात उपलब्ध आहेत आणि त्यापैकी एक नाणी दिल्ली येथे राष्ट्रीय संग्रहालयात ठेवण्यात आलेली आहे व दोन किंवा तीन नाणी महाराजांच्या वंशजांकडे पुजनेसाठी आहेत आणि तीन होन नाणी, *NUMISMATICS ART OF INDIAN MEMBER अशोक सिंह ठाकूर, चंद्रपूर* येथील महान व मोठे संग्राहक यांच्याकडे आहेत. ज्या एक नाण्याची किंमत सव्वा लाखांपेक्षाही जास्त आहे.
रायगडावर शिवराज्याभिषेक ३५० व्या सोहळ्या निमित्त २ जून २०२३ रोजी अशोक सिंह ठाकूर साहेब यांच्या नानींचे पूजन माजी मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये झाले. जहांगिर बादशहाचे सोन्याचे नाणी जगभरात फक्त चार उपलब्ध आहेत व मुख्य म्हणजे त्यापैकी एक नाणं ठाकूर साहेबांच्या संग्रही आहे या कार्यक्रमावेळी ठाकूर साहेबांनी *"दिलावर आप तारीख और सिक्कों के दिलबर होते जा रहे हो"* असे संबोधले. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर साहेबांची आठवण झाली. मराठी व उर्दू भाषेचे प्रख्यात कवी तथा नामवंत निवेदक अजीम नवाज राही साहेब यांच्याही कवितांना उजाळा मिळाला. या कार्यक्रमावेळी मुख्य आयोजक पियूष अग्रवाल, अशोक सिंह ठाकुर, आशिष शेजपाल, संदीप असर, पप्पू प्रेम, नाणेतज्ञ शेख दिलावर व फैजान शेख आदीं मान्यवर उपस्थित होते.

14
5190 views