logo

MKCL व SIIT कॉम्पुटर सेंटर च्या वतीने विद्यार्थ्यांमार्फत सारथी कडून मराठा समाजासाठी मिळणाऱ्या विविध मोफत योजनांची माहिती सांगितली.

26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त धाराशिव जिल्ह्यातील आंबेवाडी, मेड्सिंगा, चिखली, राजुरी, आरनी, महळुंगि, खानापुर, बोरगांव झाडी, गोवर्धन वाडी, उंबरे कोठा धाराशिव विवध ग्रामपंचायत येथे MKCL व SIIT कॉम्पुटर सेंटर च्या वतीने विद्यार्थ्यांमार्फत सारथी कडून मराठा समाजासाठी मिळणाऱ्या विविध मोफत योजनांची माहिती ग्रामस्थांना मार्गदर्शनपर करून देण्यात आली.
ग्रामसभेत एस आयटी कॉम्प्युटर इन्स्टिटयूटचे सारथी कोर्स चे लाभार्थी विद्यार्थी भैरवनाथ दरेकर सर, अर्जून बारांगुळे, आकाश बागल, अनिकेत गायकवाड, अभिजित काळे, प्रशांत मते सर, सत्यम लोमटे, पायल सूर्यवंशी मॅडम, शिवानी भद्रे, वैष्णवी भोसले या सर्वांनी मराठा समाजासाठी मोफत असलेला 6 महिन्यांचा CSMS -DEEP कॉम्प्युटर कोर्स संदर्भात माहिती दिली. सारथी संस्थेमार्फत एमपीएससी यूपीएससी करत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण व कौशल्य विकास उपक्रम अशा विविध उपक्रमांची माहिती दिली तसेच विविध कॉम्प्युटर कोर्स, वाढते सायबर गुन्हे याला बरेच लोक बळी पडतात याला रोखण्यासाठी काय उपाययोजना करावी यासह विविध माहिती दिली जाते. याप्रसंगी गावातील संबंध नागरिक ग्रामस्थ सरपंच उपस्थित होते. या उपक्रमासाठी SIIT COMPUTER सेंटर चे टीम आकाश मोरे, ऋतुराज घेवारे, अविनाश वाघमारे, शशिकांत वाघमारे यांच्याकडून आयोजन व MKCL जिल्हा समन्वयक श्री. धनंजय जेवळीकर सर यंच्याकडून मार्गदर्शन मिळाले.

5
2837 views