logo

उज्वल अकॅडमीची एन.एम.एम. एस परिक्षेत सुवर्ण कामगिरी....



सांगवी नांदेड येथील उज्वल अकॅडमी च्या दोन विद्यार्थिनी कु. संचिता सरपाते आणि समीक्षा तळेगावकर यांनी यावर्षी घेण्यात आलेल्या एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.
आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून दरवर्षी या परीक्षेचे आयोजन केले जाते, यामध्ये प्रा. माधव खिल्लारे सरांच्या मार्गदर्शनातून या मुलींनी आपले व आपल्या उज्वल अकॅडमी चे नावलौकिक केले आहे.
या सुवर्ण कामगिरीमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रा. माधव खिल्लारे सर व त्यांच्या संपूर्ण शिक्षक शिक्षिका यांचे मोलाचे योगदान असल्याचे या विद्यार्थिनींनी नमूद केले आहे.
सांगवी नांदेड परिसरात जय भवानी नगर येथे क्युरिओ सिटी प्रायमरी स्कूल आणि इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्राध्यापक माधव खिल्लारे सर यांनी उज्वल अकॅडमी ची स्थापना केली असून, मागील दोन-तीन वर्षांमध्ये या शाळेने व उज्वल अकॅडमी ने सांगवी नांदेड परिसरामध्ये शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध करून विद्यार्थ्यांना यशस्वी होण्याचा मूलमंत्र देण्याचे अविरत कार्य हाती घेतले आहे.
त्याचबरोबर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी 100% हमी देणारी एकमेव अकॅडमी म्हणजे उज्वल अकॅडमी आहे असे प्रा.माधव खिल्लारे सरानी यावेळी नमूद केले तसेच जास्तीत जास्त पालकांनी आमच्या उज्वल अकॅडमी ला आपल्या पाल्यांसाठी योग्य क्लास निवडण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने भेट देत आहेत हीच खऱ्या अर्थाने आमच्या अकॅडमीची ओळख आहे.
तसेच नर्सरी एलकेजी युकेजी आणि पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सांगवी परिसरातील पालकांसाठी आमची प्रायमरी स्कूल आणि उज्वल अकॅडमी ही पालकांची पहिली पसंती बनली आहे तसेच जास्तीत जास्त पालकांनी आपल्या पाल्यांचे भवितव्य निश्चित करण्यासाठी उज्वल अकॅडमी मध्ये प्रवेश निश्चित करावा आणि अभ्यासातील कोणत्याही स्तरावर असलेल्या विद्यार्थ्यांची प्रगती कशी साध्य करून घेता येते याचा प्रत्यक्ष अनुभव आपण स्वतः या ठिकाणी प्रवेश केल्यावर अनुभवावा असे आवाहन यावेळी प्राध्यापक माधव खिल्लारे सरांनी सर्व पालकांना केले आहे.

संचिता सरपाते व समीक्षा तळेगावकर यांनी प्राप्त केलेले सुवर्णपदक उज्वल अकॅडमीच्या अचूक शिक्षण पद्धतीचा एक दर्जेदार नमुना आहे व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी उज्वल अकॅडमीच्या माध्यमातून आपली प्रगती निश्चित करावी असे आवाहन उज्वल अकॅडमीच्या सहसंचालिका सौ.आशा माधव खिल्लारे यांनी केले आहे.
या यशस्वी कामगिरीबद्दल सांगवी परिसरातील सर्व पालकांकडून यशस्वी विद्यार्थ्यांचे व उज्वल अकॅडमी चे खूप मोठ्या प्रमाणावर कौतुक होत असून निश्चितपणे येणाऱ्या काळात उज्वल अकॅडमी ही दर्जेदार शिक्षण पद्धती आणि अभ्यासाचे योग्य नियोजन करून विद्यार्थ्यांना आपले ध्येय साध्य करण्यासाठी योग्य दिशा दाखवणारी एक खूप मोठी संस्था बनेल असा आशावाद परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे...

51
9764 views