
केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांच्या पुढाकाराने 16, 17 फेब्रुवारीला मेहकर येथे भव्य आयुर्वेदिक आरोग्य शिबिराचे आयोजन
इरफान शाह (आयमा न्युज मेहकर):
आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा लाभ सर्वसामान्यांना सुद्धा व्हावा या दृष्टिकोनातून शिवसेनेचे मुख्यनेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य आयुर्वेदिक आरोग्य शिबिराचं आयोजन केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांच्या पुढाकाराने येत्या 16 व 17 फेब्रुवारी 2025 रोजी मेहकर येथे करण्यात आले आहे.
भारताच्या प्राचीन आयुर्वेद उपचार पद्धतीचा वापर आजही मोठ्या प्रमाणात देश-विदेशामध्ये केला जातो हर घर आयुर्वेद ही संकल्पना सुद्धा केंद्र सरकारच्यावतीने राबविण्यात येत आहे. प्रत्येक भारतातील नागरिकांना आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा लाभ मिळावा या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या आयुष विभागाच्यावतीने काम केले जात आहे . बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांना सुद्धा आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा लाभ मिळावा .या दृष्टिकोनातून शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथराव शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येत्या 16, 17 फेब्रुवारीला बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे आयुर्वेदिक आरोग्य शिबिर केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये कर्नाटक येथील सुप्रसिद्ध डॉक्टर तथा मैसूर राजघराण्याचे राज्यवैद्य वंशज डॉ. लोकेश टिकल उपस्थित राहणार आहेत. मेहकर येथील राजश्री आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल येथे होणाऱ्या या आयुर्वेदिक शिबिराचा लाभ जिल्ह्यातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन युवा सेनेचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव तथा जिल्हाप्रमुख ऋषी प्रतापराव जाधव यांनी केल आहे.