आडगांव बाजार ग्रामपंचायत येथे संत सेवालाल महाराज यांची २८६ जयंती साजरी.
विलास चव्हाण न्युज: आडगांव बाजार येथील ग्रामपंचायत येथे संत सेवालाल महाराज यांची २८६ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
आडगांव बाजार ग्रामपंचायतीने संयुक्तपणे हा कार्यक्रम आयोजित केला होता. आडगांव चे उपसरपंच राठोड यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली.
यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य,आडगांवचे पशुवैद्यकिय अधिकारी,व मिलींद ठोके,गजानन चकोर,
अमोल चव्हाण, चांदु मिटकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.