इंग्रेजी कथाकथन स्पर्धेत गुलाब नबी आझाद उर्दू गर्ल्स शाळेचे यश - मुख्याध्यापिका फरहादीबा हुसेन
अकोला / मूर्तिजापूर :- मूर्तिजापूर तालुका प्रतिनिधी शिक्षण विभाग जिल्हा परिषद अकोला व महाराष्ट्र इंग्लिश टीचर्स असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने अंग्रेजी कथाकथन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत गुलाम-नबी आझाद उर्दू गर्ल्स शाळेने तालुक्यातून द्वितीय क्रमांक मिळविला आहे.
मूर्तिजापूर शहरातील गुलाम-नबी आझाद उर्दू गर्ल शाळे मधून अंशरा फातिमा मिर्जा शकील बेग,हफ्सा सबात सैयद सुहैल अहमद, या दोन मुलींनी सदर स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळून प्रमाणपत्र व मेडल शिक्षण अधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. सदर स्पर्धेकरिता शिक्षक फरहद यांनी मार्गदर्शन केले असेच मुलींनी पुढे येऊन प्रत्येक स्पर्धात सहभागी व्हावे व आपल्या तालुक्याचा व शाळे चा नाव उजवलं करावे असे प्रतिपादन शाळेचे मुख्याध्यापिका फरहादीबा हुसेन यांनी केले.