logo

कव्हळा येथे प्रधान मंत्री घरकूल योजना (ग्रामिण) टप्पा २.. मंजूर घरकूल प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम संपन्न*


ग्रामविकास विभागाच्या आदेशान्वये गट ग्रामपंचायत कव्हळा सावरखेड यांच्या कडून आयोजीत प्रधान मंत्री ग्रामीण घरकूल योजना टप्पा २.. मंजूर घरकूल प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम दिनांक २२ फेब्रुवारी २०२५ रोजी कव्हळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ग्रामस्थांच्या उपस्थीत पार पडला... या प्रसंगी कव्हळा सावरखेड गट ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच श्री रविंद्र नारायणराव डाळीमकर यांनी प्रास्ताविक करून गावकऱ्यांना शासकीय घरकूल योजनांच्या संदर्भात विस्तृत मार्गदर्शन केले, तसेच ग्रामपंचायत अधिकारी श्री आर. के. खेडेकर साहेब यांनी घरकूल योजनेत पात्र होण्यासाठी लागणारे लागणारे कागदपत्र, जागेची उपलब्धता, नियम, या बद्दल सविस्तर माहिती दिली व गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्याला उत्तरे दिली... या प्रसंगी पुणे येथून ग्रामविकास विभागाच्या वतीने प्रक्षेपित १० लाख नागरिकांना एकाच वेळी मंजूर झालेल्या नागरिकांना प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम live telecast गावकऱ्यांना दाखविण्यात आला..या प्रसंगी फार मोठया प्रमाणावर गावकरी उपस्थीत होते...

10
2013 views