logo

अमरावती जिल्यामध्ये विलास नगर येथील १७ नंबर शाळेत महाराष्ट्र अंनिस ने घेतला चमत्कार सादरीकरण व त्या मागील विज्ञान

आज दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अमरावती द्वारा *हातचलाखी चमत्कार व त्यामागील विज्ञान* हा प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविण्यात आला. चमत्काराचे प्रात्यक्षिक करून त्या मागील विज्ञान तसेच प्रबोधन महानगरपालिका 17 नंबर, विलास नगर अमरावती येथील शाळेत करण्यात आला.

बाबा बुवा यांची हात चलाकी दाखवताना हवेतून साखळी काढण्याचे प्रात्यक्षिक करण्यात आले. तसेच हवन कुंडात अग्नी प्रज्वलित करण्याचे प्रात्यक्षिक करून त्यामागील केमिकल रिएक्शन सांगण्यात आले. काही प्रात्यक्षिका केल्यानंतर विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आले..

कार्यक्रमाला अमरावती शहर शाखा सांस्कृतिक विभागाचे श्वेतांबरी यांनी तांदुळाचा प्रयोग व विज्ञान विद्यार्थ्यांना समजावून सांगितला..

कार्यक्रमाची सुरुवात "कोण्या कोण्या शक्तीला घाबरतो तू" या गीताने करण्यात आली. ५० ते ६० विद्यार्थी यांच्याकडून, "बुवा बाबा कडून स्वतःची फसवणूक करून घेणार नाही" तसेच " का व कसे" असे प्रश्न विचारायला शिका! असे प्रॉमिस मुलांकडून घेण्यात आले..
कार्यक्रमाचा व्यवस्थापन व प्रभारी मुख्याध्यापिका वैशाली सोमवंशी मॅडम त्यांच्या देखरेखी व्यवस्थित पार पडले..

6
933 views