logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

गायरानमधील अतिक्रमणांचे नियमीतकरणाचे ग्रामपंचायतीला लेखी आदेश देण्याची मागणी

खंडेराजूरी ( ता. मिरज) येथील गायरानमधील अतिक्रमणांचे नियमीतकरणाचे ग्रामपंचायतीला लेखी आदेश देण्याची मागणी अखिल भारतीय सेनेचे जिल्हाध्यक्ष विनोद कोळी यांनी मिरज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.
खंडेराजूरी येथील गायरान जमिनीचा मुद्दा कळीचा बनला आहे. अखिल भरतीय सेनेचे जिल्हाध्यक्ष विनोद कोळी यांनी तीन वर्षापूर्वी ग्रामपंचायतीने बेकायदेशीर भूखंड वाटप तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी अर्थपूर्ण तडजोडी करुन केल्याचा आरोप केला होता. अतिक्रमणामध्ये काही ग्रामपंचायत पदाधिकरीही होते. त्यांचे पद रद्द करण्याची कोळी यांनी मागणी केली होती. मात्र या तक्रारीला स्थगिती मिळाली. सदस्यावर कारवाई न झाल्याने कोळी यांनी सर्वच अतिक्रमणे नियमित करण्याची मागणी केली होती. याची मिरज पंचायत समितीमध्ये सुनावणी झाली यावेळी अधिकाऱ्यांनी अतिक्रमणे नियमितकरण्याचे आदेश दिले होते. मात्र हे आदेश तोंडी होते. मात्र अतिक्रमणचा वाद व
तक्रारी वाढू लागल्याने विनोद कोळी यांनी सुनावणीवेळी अतिक्रमण नियमीतीकरणाबाबत दिलेल्या तोंडी आदेशामुळे ग्रामपंचायत अतिक्रमण नियमीत करणेबाबत कोणतीच भूमिका घेत नाही. त्यामुळे मिरज पंचायत समिती प्रशासनाने ग्रामपंचायतीस नियमीतीकरण करण्याचे लेखी आदेश देण्याची मागणी केली आहे

175
12925 views

Comment