logo

*क्युरिओसिटी प्री प्रायमरी स्कूल व उज्वल अकॅडमी चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*


सांगवी नांदेड येथे क्युरिओसिटी प्री प्रायमरी स्कूल व उज्वल अकॅडमी सांगवी नांदेड येथे दिनांक 5 मार्च 2025 रोजी सायंकाळी पाच वाजता वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. यावर्षीच्या वार्षिक स्नेहसंमेलनाची संकल्पना *कलाविष्कार 2025* ही होती. जी विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना उज्वल भविष्यात प्रोत्साहन देणारी ठरेल. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने झाली. कार्यक्रमात विविध स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री. संभाजी सूर्यवंशी अध्यक्ष ऑडिटर्स कौन्सिल अँड वेल्फेअर असोसिएशन नांदेड, मा.श्री. विनोद भा.देशमुख पोलीस उपनिरीक्षक भाग्यनगर पोलीस ठाणे नांदेड, मा.श्री.दत्ता पाटील कोकाटे भाजपनेते तथा माजी नगरसेवक प्रतिनिधी नांदेड, मा. श्री.श्याम पाटील कोकाटे शिवसेना नेते तथा माजी नगरसेवक प्रतिनिधी नांदेड, मा. श्री गणेश पाटील कोकाटे तालुका अध्यक्ष युवक काँग्रेस नांदेड, मा. श्री. सत्यवान पाटील अंभोरे सामाजिक कार्यकर्ते, मा.श्री.रवींद्र सूर्यवंशी संचालक ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल दाभड, मा.श्री. राजीव घोडके सर संचालक विस्डम इंग्लिश स्कूल सांगवी, मा. श्री.अशोक पवार पालक प्रतिनिधी यांची उपस्थिती होती. सांस्कृतिक कार्यक्रमाची धमाकेदार शानदार सुरुवात गणपती सॉंग ने झाली. जय हो, संदेशे आते है, या गीताने श्रोत्यांत देशभक्तीची भावना जागृत झाली. उज्वल अकॅडमीच्या इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थिनींनी मै अगर कहू, मराठी रिमिक्स गीत , साडी के फॉल सा या गीतांनी टाळ्यांचा कडकडाट मिळवला व मुलांनी सादर केलेले विठ्ठला गीत यामुळे थोड्यावेळा करता संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते. पुढे क्युरिओ सिटीच्या चिमुकल्यांनी बम बम भोले, कश्मीर टू कन्याकुमारी, तुला फिरवीन माझ्या गाडीवर तसेच प्री प्रायमरीच्या चिमुकल्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या बाई वाड्यावर या या लावणीने उपस्थितांची मने जिंकली. मुझे माफ करना ओम साई राम या गीताने प्रेक्षकांना अक्षरशः रडविले या स्नेहसंमेलनात प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. शाळेचे संचालक प्राध्यापक माधव खिल्लारे सर यांनी शैक्षणिक वर्ष 2024 25 मध्ये शाळेने विद्यार्थ्यांसाठी केलेल्या योजनांची माहिती प्रास्ताविकात दिली व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांच्या पुढील भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. या यशस्वी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उज्वल अकॅडमी ची विद्यार्थिनी कुमारी समीक्षा तळेगावकर हिने केले तर आभार प्रदर्शन शाळेच्या प्राचार्या सौ आशा खिलारे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उज्वल अकॅडमी व क्युरिओसिटी चे श्रीमती वाणी मॅडम, सौ विद्या कसबे मॅडम, मनीषा जोंधळे मॅडम, शाळेच्या कोरिओग्राफर जाधव मॅडम व श्री मिलन जैन बारड़कर यांनी परिश्रम घेतले.

73
7231 views