logo

रेड स्वस्तिक सोसायटीतर्फे कर्तबगार महिलांचा सन्मान

जळगाव (ता.जि जळगाव महाराष्ट्र)रेड स्वस्तिक सोसायटी जळगाव, नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव आणि मानवता कॅन्सर सेंटर नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला. यावेळी गोदावरी फाउंडेशनच्या सदस्या डॉ. केतकी पाटील, रेड स्वास्तिकचे सह महाव्यवस्थापक अशोक शिंदे, महिला गृह उद्योग लिज्जत पापडचे सुरेश कोते, अपर जिल्हाधिकारी विजय ढगे, प्रा. क्षमा सराफ आणि नारीशक्तीच्या मनीषा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

56
2571 views