logo

संत निरंकारी मंडळाच्या रक्तदान शिबिरात 103 जणांनी केले रक्तदान

*संत निरंकारी मंडळाच्या रक्तदान शिबिरात 103 जणांनी केले रक्तदान*
सद्गुरु माता सुदिक्षा जी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने संत निरंकारी मिशनच्या कवठेमहांकाळ ब्रांच मध्ये झालेल्या रक्तदान शिबिरामध्ये 103 जणांनी रक्तदान करून मानवतेच्या कल्याणामध्ये आपला सहभाग नोंदवला. हे शिबिर जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने संपन्न झाले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन सिविल हॉस्पिटल कवठेमहांकाळ चे अधीक्षक डॉ. अजय भोसेकर यांच्या हस्ते व प.आ. नंदकुमार झांबरे जी झोनल इन्चार्ज सातारा यांचे उपस्थितीत संपन्न झाले. निरंकारी मिशन आपल्या वेगवेगळ्या उपक्रमांमधून या विश्वा समोर आपला सुंदर आदर्श ठेवत आहे .यामध्ये वृक्षारोपण ,स्वच्छता अभियान ,अमृत जल प्रोजेक्ट ,आपतग्रस्तांसाठी मदत, रक्तदान शिबिर या सर्व उपक्रमातून या विश्वाला मानवतेचा आणि विश्व बंधुत्वाचा भक्तिमार्गातून संदेश देत आहे. खून नाली मे नही नाडी मे बहना चाहिए,या बाबाजींनी दिलेल्या संदेशानुसार मिशन प्रत्येक वर्षी लाखोच्या संख्येने रक्त संकलित करीत असते. या अभियानामध्ये तरुण मुले सहभागी होतात आणि चांगल्या मार्गावरती आपला प्रवास करतात ही गोष्ट सर्वांसाठीच प्रेरणादायी असल्याचे मत स्वतः रक्तदान करत डॉक्टर अजय भोसेकर यांनी व्यक्त केले, रक्त संकलित करण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटल मिरज आणि सांगली येथून दोन डॉक्टरांचे टीम उपस्थित होत्या. रक्तदान करण्यासाठी प्रत्येकाचा उत्साह ओसंडून वाहत होता .हे तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत होते हे लक्षात आले. यावेळी सेक्टर इन्चार्ज प.आ.जालिंदर जाधव जी ,क्षेत्रीय संचालक जगन्नाथ निकाळजे हे ही उपस्थित होते. रक्तदान शिबिराचे आयोजन ब्रांच मुखी प.आ. शंकर पाटील जी व सेवा दल संचालक प.आ. उत्तम कांबळे जी यांनी केले. यावेळी सर्व सेवा दल बंधू भगिनी आणि महात्मा महापुरुष उपस्थित होते.

4
2982 views