logo

सातारा : या शहरातील यांची कबर हटवावी : निवेदनाद्वारे मागणी

फलटण : छत्रपती संभाजी महाराज नगर या शहरातील हिंदू द्वेष्टा क्रूरकर्मा औरंगजेब याची कबर हटवावी अशी मागणी विश्व हिंदू परिषद व बजरंग दल फलटण यांच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याबाबत निवेदन आज सोमवार दि. १७ मार्चला दुपारी प्रांताधिकारी कार्यालय फलटण येथे देण्यात आले. निवेदनाची प्रत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना पाठविण्यात आली आहे. यावेळी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे पदाधिकारी उपस्थित होते. तरी संबंधित कबर योग्य पद्धतीने नष्ट करावी अशी मागणी निवेदनात केली आहे.

6
1477 views