सातारा : १८ वर्षीय युवकाचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू
कोरेगांव : सर्कलवाडी ता. कोरेगाव येथे वसना पाणी पुरवठा टाकीत पडून पंकज प्रभाकर अनपट (वय १८) या युवकाचा याचा मृत्यू झाला आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की सर्कलवाडी ता. कोरेगाव गावचे हद्दीतून वसना योजनेची पाईपलाईन व त्यावर पाणी पुरवठ्याची टाकी उभारण्यात आली आहे. मंगळवार दि. १८ मार्चला सायंकाळी ७ वाजता नातेवाईकांनी शोधाशोध केल्यानंतर पंकज अनपट हा पाण्याच्या टाकीत पडलेला दिसला. त्याला गावातील लोकांच्या मदतीने टाकीतून बाहेर काढले पिंपोडे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र डॉक्टरांनी मयत झाल्याचे सांगितले.