logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

आधार हाऊसिंग फायनान्सच्या कारभाराची चौकशी करा : अखिल भारतीय सेनेचे सांगली जिल्हाध्यक्ष विनोद कोळी

सांगली जिल्ह्यांमध्ये आधार हाऊसिंग फायनान्स या कंपनीने आपल्या परवान्याचा गैरवापर करीत लोकांच्या फसवणुकीचे प्रकार केलेले आहेत.
खंडेराजुरी येथील यांना घर बांधकामासाठी कर्जाची गरज असल्याकारणाने त्यांनी वरील कंपनीकडे कर्ज मिळणेसाठी कागदपत्रे दिली होती. यांच्या याच कागदपत्राचा गैरवापर करून या कंपनीने तामिळनाडू येथील एक व्यक्तिला कर्जाची रक्कम वर्ग केली आहे. सदर बाब शहाजी संभाजीराव पाटील यांचे लक्षात आले नंतर त्यांनी संबंधित कंपनीला याबाबत वारवार सूचना केल्या होत्या. तरी देखील या कंपनीने कोणताही बदल केला नाही. तर त्यांनी त्याच कंपनीने वरील कर्जदार यांना “सदर कर्ज प्रकार हा आमच्या संगणक प्रणालीमधून बिघाड झाल्यामुळे झालेला आहे” असे लेखी दिले आहे.
या पत्राच्या अनुषंगाने जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच सांगली येथे 22/05/2024 रोजी दावा दाखल केला आहे. सदर दावा अद्याप चालू असताना वरील फायनान्स कंपनीने मुख्य न्याय दंडाधिकारीसो, सांगली यांचेकडे दि.01/07/2024 रोजी दावा दाखल करून त्यामध्ये कोर्टसमोर खोटी माहिती देवून सरफेसी कायदा 2002 मधील कलम 14(1) नुसार ताबा मिळणेकरीता अर्ज केला आहे. व त्यावरती आदेश पारित करून घेतला आहे. त्यानुसार ताबा घेणेची प्रक्रिया सदर फायनान्स कंपनीने सुरू केलेली आहे ती प्रक्रिया तात्काळ बंद करणेत यावी.
सदर बाबतीत वरील फायनान्स कंपनीने एका न्यायालयात दावा सुरू असता दुसरीकडे याबाबत माहिती न देता चुकीच्या पद्धतीने ताबा मिळणेकरीता अर्ज करून कर्जदारांची व शासनाची व मे. न्यायालयाची फसवणूक केली आहे. असे प्रकार सांगली जिल्हा मधील कित्तेक कर्जदारांच्या बाबतीत या फायनान्स कंपनीने केलेले आहे. अशी माझी खात्री झाली असल्यामुळे आधार हाऊसिंग फायनान्स या कंपनीची चौकशी करून या कंपनीवर तात्काळ कारवाई करावी. व सदर फायनान्स कंपनीने ताबा घेणेची सुरू केलेली आहे ती प्रक्रिया तात्काळ बंद करणेत यावी.
मागणी निवेदनाद्वारे केली आहे

179
19074 views
1 shares

Comment