logo

लातूर -मुंबई, हरंगुळ पुणे या एक्सप्रेस रेल गाडी ला मुरूड मध्ये थांबा मिळावा...

केंद्रीय प्रादेशिक सदस्य,मध्य रेल्वे, भारत सरकार डॉ. आदित्य पतकराव यांना रेल्वे संघर्ष समिती मुरुड च्या वतीने निवेदन देऊन सत्कार करण्यात आला.
हरंगुळ पुणे आणि लातूर मुंबई या एक्स्प्रेस गाड्यांना मुरूड मध्ये थांबा मिळावा....
डॉ. आदित्य पतकराव (केंद्रीय प्रादेशिक सदस्य महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटका ,मध्य रेल्वे. भारत सरकार) यांनी दिनांक 25/ 3/ 2025 वार मंगळवार रोजी मुरुड येथील रेल्वे स्टेशनला भेट देऊन सदरील रेल्वे स्टेशन बद्दलच्या उपाययोजनाबद्दल चर्चा केली. यामध्ये त्यांना असे सांगण्यात आले की मुरुड हे एक लाख लोकसंख्येचे गाव असून मोठी बाजारपेठ मोठ्या प्रमाणात शैक्षणिक संकुल व आरोग्य सुविधा असल्यामुळे आजूबाजूच्या 40 ते 50 गावांचा सदरील मुरुड शहराशी दररोजचा संपर्क आहे .मुरुड वरून पुणे मुंबई ला जाण्यासाठी रेल्वे सुविधा उपलब्ध झाल्यास मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करू शकता. त्यामुळे लातूर- मुंबई व हरंगुळ -पुणे या सह मुरुड वरून जाणाऱ्या सर्व गाड्यांना मुरुड येथे थांबा देण्यात यावा. मुरूड हे लातूर आणि धाराशिव दोन्ही च्या मध्ये भागी असल्याने येथून पुणे, मुंबई ला जाण्यासाठी खूप मोठ्या संख्येने पॅसेंजर मिळतील. जे लातूर आणि धाराशिव जातात ते मुरूड तेथुन जातील. तसेच मुरुड रेल्वे स्टेशन येथे ऑपरेटिंग स्टेशन व लुपलाईन तसेच प्लॅटफॉर्मची उंची व लांबी वाढविण्याबाबत चर्चा झाली. सदरील मागणी संदर्भात यावर डॉ. आदित्य पतकराव यांना रेल्वे संघर्ष समिती, मुरुड च्या वतीने निवेदन देण्यात आले. त्या अनुषंगाने सदरील विषय केंद्रीय रेल्वे मंत्री मा. अश्विनी वैष्णव व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांच्या कार्यालयाला ताबडतोब पत्र व्यवहार करून लवकरात लवकर सदरील विषय मार्गी लावू असे आश्वासन दिले. त्यानंतर विश्रामगृह मुरुड या ठिकाणी डॉ. आदित्य पतकराव यांचा ग्रामपंचायत मुरुड विविध संघटना व रेल्वे संघर्ष समिती च्या वतीने सत्कार करण्यात आला.

0
41 views