
अवैध दारूविक्री विरोधात किन्हीच्या महिलांचा एल्गार!
(मेराज पठाण
लोणार तालुका ग्रामीण, प्रतिनिधी.)
लोणार : तालुक्यातील किन्ही येथे अवैध दारू विक्रीमुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. त्यामुळे गावातील महिलांसह नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत दारूच्या अवैध विक्रीला लगाम लावावा व गावात दारूबंदी करावी, अशी मागणी करीत गुरुवारी पोलिस स्टेशनमध्ये धडक दिली. याप्रसंगी विविध मागण्यांचे निवेदन ठाणेदारांना देण्यात आले.
महिलांनी दिलेल्या निवेदनानुसार, गावात दारूच्या अवैध विक्रीमुळे काही महिलांचे पती व किशोरवयीन मुले व्यसनाधीन झाली आहेत. कौटुंबिक अत्याचाराच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. यामुळे गावातील लग्नसमारंभ व इतर सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये भांडणे होऊ लागली आहेत. दारू विक्रेत्यांवर कोणाचाही वचक नसल्यामुळे राजरोसपणे दारू विकली जात असल्याचा आरोप महिलांनी केला. गावात संपूर्ण दारूबंदी लागू करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
निवेदन देतानानिलेश चव्हाण पाटील,आकाश डोळे, सचिन मापारी , गजानन नागरे, शिवप्रसाद कायंदे, निलेश कायंदे, नारायण चव्हाण, गणेश नागरे, प्रकाश वाघ यांच्यासह महिला उपस्थित होत्या.
पोलीस स्टेशन, लोणार
जि. बुलडाणा
ठाणेदारांना निवेदन देताना किन्ही येथील ग्रामस्थ