logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

कोट्यवधींचा गंडा, शेवगावचा बिग बुल साई कवडेच्या गुजरातमधून आवळल्या मुसक्या

कोट्यवधींचा गंडा, शेवगावचा बिग बुल साई कवडेच्या गुजरातमधून आवळल्या मुसक्या

शेवगाव

शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून गुंतवणूकदारांना जास्त परतावा देण्याच्या आमिषाने गंडा घालणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शेवगावचा बिग बुल समजला जाणारा साईनाथ कल्याण कवडे याच्या गुजरातमधून पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

अनेक गुंतवणुकदारांपैकी एक असलेले अवधुत विनायक केदार, रा.खंडोबानगर, शेवगाव, ता.शेवगाव यांना साईनाथ कल्याण कवडे, रा.कुरूडगाव ता.शेवगाव याने त्याचे ऍ़सिटेक सोल्युशन ट्रेडींग कंपनीमध्ये पैसे गुंतविण्यास सांगुन गुंतवणुक केलेल्या रक्कमेवर दरमहा 12% परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. त्यावर केदार व त्याचे कुटुंबियांतील सदस्यांनी तसेच परिसरातील इतर 5 लोकांनी वेळोवेळी ऍ़सिटेक सोल्युशन ट्रेडींग कंपनीमध्ये 1 कोटी 61 लाख 42 हजार 900/-रूपये गुंतविले होते. आरोपीने गुंतवणुकीच्या रक्कमेचा परतावा न देता तसेच गुंतवणुक केलेली रक्कम न देता आर्थिक फसवणुक करून पळून गेला.

याबाबत पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी एलसीबी पोलिस निरीक्षक दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा यांना आर्थिक फसवणुकीबाबत दाखल गुन्ह्यांचे समांतर तपास करणेबाबत आदेश दिले असता एलसीबीने सुरत, गुजरात येथे जाऊन आरोपीचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने आपणच साईनाथ कवडे असल्याचं कबूल केले आहे.

147
5453 views

Comment