वाहन धारकांकडून सरकारी लूट!
H.R.S.P. नंबर प्लेट! दर आणि सुरक्षाच्या नावाखाली एक दिशाभूल!
रामदास ढोरमले
अहिल्यानगर, महाराष्ट्र
परिवहन खात्याकडून २०१९ पूर्वीच्या वाहनाना HSRP नंबर प्लेट बंधनकारक केली आहे. व मुदत वाढ ३०जून २०२५ पर्यंत केलेली आहे. पण प्रत्यक्षात परिवहन खात्याने सूचित केल्याप्रमाणे ऑनलाईन पैसे भरूनही फिटिंग केंद्रात ही आवाजवी पैसे आकारले जातात जसे की प्लास्टिक ब्रॅकेट आणि फिटिंग किट च्या नावाखाली वेगवेगळ्या स्वरूपात रोख पैश्याची मागणी केली जाते. तसेच नंबर प्लेट च्या सुरक्षाबाबत ही काही खास उपयोग होणार नाहीं. कारण नंबर प्लेट फिटिंग करताना फक्त onetime वापरता येणारे रिबिट्स लावून प्लेट फिट केली जाते. व ती फक्त एकाच मिनिटामध्ये बदलता येऊ शकेल अशा स्वरूपात फिट केलेली असते. जर सरकारला सुरक्षा द्यायचीच होती तर प्रत्येक वाहन फास्ट टॅग सारखे स्टिकर देऊन ही ऑनलाईन रेकॉर्ड ठेवता येऊ शकले असते. असा अनेक वाहन धारकांनी अपेक्षा व्यक्त केली आहे. फुकट वेळ आणि पैसा दोन्ही गोष्टी चा अपव्यय टाळता आला असता. अशा अनेक प्रकारे ही फक्त एक दिशाभूल आहे..