
जिल्हा परिषद बाभुळगाव शाळेचे स्नेहसमेलन उत्साहात संपन्न ; शालेय जीवनातील संस्कार आयुष्य घडवणारे - डाॅ. सुंदर गोरे
राहुरी : जिल्हा परिषद बाभुळगाव शाळेचे स्नेहसमेलन नुकतेच उत्साहात संपन्न झाले. महाराष्ट्राची लोकगाणी या थीमवर आधारीत पारंपारिक वेषभूषेसह विद्यार्थ्यांनी विविध नृत्ये सादर केली. या कार्यक्रमासाठी अहिल्यानगरचे प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डाॅ. सुंदर गोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच मुक्ताबाई गि-हे, उपसरपंच दत्तात्रय ससाणे, चेअरमन विठ्ठल डव्हाण, अध्यक्ष दत्तात्रय कजबे, पोलिस पाटील उमेश पाटोळे, सदस्य हरिभाऊ पाटोळे, अनिल वाघमारे व शिक्षण प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची अध्यक्ष सुचना बाळासाहेब थोरात यांनी मांडली तर रावसाहेब पाटोळे यांनी अनुमोदन दिले. मुख्याध्यापक धर्मराज घुले यांनी प्रास्ताविक करुन उपस्थितांचे स्वागत केले. गोरक्षनाथ गि-हे यांनी कार्यक्रमासाठी विद्यार्थी कलाकारांना शुभेच्छा दिल्या. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डाॅ. सुंदर गोरे यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणी सांगितल्या. तसेच जि. प. शाळा सर्वांगीण व्यक्तिमत्व घडवतात म्हणून त्यांचे महत्व कायम आहे असे प्रतिपादन केले. पत्रकार विलास गि-हे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. यावेळी सादर करण्यात आलेल्या नृत्याला ग्रामस्थ व पालकांनी भरभरून देणगी देऊन प्रतिसाद दिला. इंडियन आर्मी मधे निवड झालेले प्रशांत पाटोळे, साॅफ्टवेअर इंजिनियर म्हणून नियुक्त दुर्गा हरिश्चंद्रे, युवा प्रशिक्षणार्थी प्रशांत हरिश्चंद्रे यांचा यावेळी ग्रामस्थ्यांचे वतीने सत्कार करण्यात आला. विद्यार्थी कला सादरीकरणाचे सर्व पालक, ग्रामस्थ यांनी बक्षीस देऊन कौतुक केले.