logo

*सन्मानाने उंच उभी, अभिमानाने स्वावलंबी, आर्थिक साक्षरतेने सशक्त - हीच खरी गुढी स्त्रीशक्तीची!*.

सह्याद्री महिला प्रतिष्ठानच्या वतीने नववर्षाची प्रेरणादायी सुरुवात. आज जुन्नर मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतिस्थळी, सह्याद्री महिला प्रतिष्ठानच्या वतीने महाराजांना विनम्र अभिवादन करून स्त्री सन्मानाची गुढी उभारून अनोखा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला. महाराजांच्या पुतळ्यासमोर, स्त्रीशक्तीच्या सन्मानाची गुढी उभारण्यात आली - ही गुढी केवळ सणाची नव्हे, तर स्वाभिमानाने उंच उभी असलेली, अभिमानाने स्वावलंबी झालेली आणि आर्थिक साक्षरतेने सशक्त बनलेली स्त्रीशक्तीची खरी गुढी आहे!या गुढीतून आम्ही स्त्रीयाच्या स्वाभिमानाला अभिवादन केले , आर्थिक साक्षरतेचा संदेश घराघरांत पोहोचवला, स्वावलंबी स्वभावाला प्रोत्साहन दिले आणि आत्मसन्मानाचा झेंडा फडकवला. ही गुढी म्हणजे शिक्षणाची प्रेरणा, आरोग्य जागरूकतेचा नाद, आत्मनिर्भरतेची शिदोरी आणि आत्मविश्वासाचा अखंड प्रकाश! यासोबतच, कर्तृत्वाचा ठसा, हक्कांप्रती जागरूकता आणि न्यायसंगत अस्तित्वाचा आवाज या सर्वांचा समावेश या गुढीतून व्यक्त झाला. अशा या प्रतीकात्मक व वैशिष्ट्यपूर्ण गुढीने नवीन वर्षाची सुरुवात आम्ही साजरी केली.हा कार्यक्रम यशस्वी करण्यात सह्याद्री महिला प्रतिष्ठानच्या - शोभाताई शिंदे, कांचनताई मेहेर, सुनिताताई उतळे, अर्चनाताई पवार, नयनाताई तांबे, वंदनाताई काशीद, स्वातीताई धोंडकर, सीमाताई रघतवान, रेश्माताई डोके, सरस्वतीताई बोराडे, कविताताई गीधे आणि सोनालीताई रोकडे - यांनी आपल्या अमूल्य सहकार्याने आणि अथक परिश्रमाने मोलाची साथ दिली. सह्याद्री महिला प्रतिष्ठानच्या प्रत्येक महिलेच्या कर्तृत्वामुळे आणि एकजुटीमुळे हा उपक्रम यशस्वी ठरला आणि स्त्रीशक्तीचा गौरव नव्या उंचीवर पोहोचला.
चला, एकत्र मिळून स्त्रीशक्तीला नवे पंख देऊया आणि समाजाला प्रगतीच्या मार्गावर नेऊया!
#junnar #जुन्नर #गुढीपाडवा #स्त्रीसन्मान #सह्याद्रीमहिलाप्रतिष्ठान

0
140 views