logo

रिसोड येथे रमजान इद उत्साहात साजरी

रिसोड येथे रमजान इद उत्साहात साजरी

महेंद्र कुमार महाजन

रिसोड :- मागील एक महिन्यां पासून सुरू असलेल्या रमजान महिन्यातील रोजे जलद सांगता दिनांक 31 मार्च रोजी ईद-उल-फित्र ईद-उल-फित्र ने साजरी होत झाली. काल दिनांक 30 रोजी संध्याकाळी चंद्र दर्शन झाल्यानंतर शहर व तालुक्यात ईद साजरी करण्याची घोषणा करण्यात आली. यासाठी मुस्लिम धर्मीयांची कालपासूनच लगबग सुरू झाली. त्यासाठी लागणारे दूध, सुकामेवा, कपडे आदीची खरेदी पूर्वीच करण्यात आली होती.

ईदगाह वर जाण्यापूर्वी सर्व मुस्लिम बांधवांनी अन्नदान केले
आज सकाळी 8:30 वाजता शहरातील विविध भागातील मुस्लिम धर्मीय समाजातील लोक शाही इमाम मोहम्मद दयार यांचे नेतृत्वात लोणी मार्ग स्थित इदगाहकडे रवाना झाले. तेथे मोहम्मद दयार यांनी शहरातील एकत्रित झालेल्या सर्व मुस्लिम बांधवांना ईद ची नमाज पठण करवाली. ईदगाह वर जाण्यापूर्वी सर्व मुस्लिम बांधवांनी अन्नदान केले होते. नमाज नंतर देशात शांती नांदावी, भाईचारा वाढावा, शेतकरी मजूर वर्ग सुखावा व व्यापारात समृद्धी यावी यासाठी प्रार्थना करण्यात आली. नंतर सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळाभेट देताना सुभेच्छा दिल्या व एकमेकांच्या घरी जाउन शीरखुर्मा चा आस्वाद घेतला. नमाज पठणाच्या वेळी इदगाह वर आमदार अमित झनक, ठाणेदार रामेश्वर चव्हाण, नायब तहसीलदार जवादे,विश्वनाथ सानप, तलाठी धनंजय काष्टे, तलाठी स्वप्निल धांडे, रिसोड तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सतीश मांदळे, पोलिस पाटील गजानन कोरडे,बबनराव गारडे,,बबनराव मोरे,दतराव धांडे, मंचकराव देशमुख, प्रा.विजय तुरुकमाने, विनोद खडसे, शंकर सदार, बंडु वानखेडे, राजु खांबलकर, रोहित दांदडे, मुन्ना गांजरे, डॉ. राम बोडखे, उपस्थित होते. यावेळी इदगाह वर पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महात्मा फुले व्यायाम शाळेने आपली परंपरा जोपासली आहे. इदगाह वरून परतणाऱ्या मुस्लिम बांधवांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी माजी नगराध्यक्ष वसंतराव इरतकर व व्यायाम शाळेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

3
192 views