logo

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर डोंबिवली - कल्याण मध्ये भव्य शोभायात्रांची सुरुवात झाली .

डोंबिवली शहरातून आज रविवार , दि . ३० मार्च २०२५ रोजी सकाळी ७ : ३० वा. विष्णुनगर पोलीस ठाण्याचे हद्दीतून श्री.अमेय काटदरे,

हिंदू धर्मातील साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी गुढीपाडवा सण देखील एक शुभ मुहूर्त आहे. या दिवशी नवीन कार्यांची सुरुवात करणे शुभ मानले जाते. तसेच प्रभू श्रीराम चौदा वर्षे वनवास करुन माता सीतासह आपल्या नगरीमध्ये परतले होते, तो दिवसही चैत्र शुक्ल प्रतिपदेचा होता, म्हणूनचा या दिवशी आनंदोत्सव साजरा केला जातो.

त्या निमित्ताने गुढीपाडव्याच्या शोभायात्रा सन दि . १८ मार्च १९९९ , गुरुवार पासुन डोंबिवलीतील श्री गणेश मंदिर संस्थेच्या वतीने सुरु झालेली शोभायात्रा बघता बघता आज २६ वर्षे पूर्ण झाली .

गुढीपाडवा निमित्ताने लेझीम , ढोल - ताशांच्या गजरात पथकाच्या माध्यमातून सुरुवात झाली . चौका चौकामध्ये पुष्पवृष्टी करण्यात आली. आणि पर्यावरण संवर्धन
( संरक्षण ) साठी जनजागृती चित्ररथ तयार करण्यात आले होते .

श्री . गणेश मंदिर संस्थान, यांच्या मार्गदर्शनाखाली गुढीपाडवा नव वर्ष शोभायात्रा मिरवणूक काढण्यात आली.

शोभायात्रा विष्णू नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत नियोजित मार्गे फिरून भाग शाळा मैदान, अशोक सम्राट चौक, दिनदयाळ रोड, कोपर ब्रिज मार्गे डोंबिवली पोलीस ठाणे हद्दीत येऊन पुढे केळकर रोड , शिवमंदिर रोड, गिरनार चौक, चार रस्ता, मानपाडा रोड, इंदिरा गांधी चौक, बाजीप्रभू चौक, फडके रोड, आप्पा दादर चौक या मार्गे गणेश मंदिर संस्थान येथे येऊन श्री गणेश पालखी मिरवणूक सकाळी १० : ४० वाजता समाप्त झाली. त्यानंतर आप्पा दातार चौक येथील सांस्कृतिक कार्यक्रम १२ : ०० वाजता समाप्त झाले .

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज व त्यांचे मावळे , बुलेट किंवा मोटरसायकल वरून पारंपारिक पद्धतीने पोशाख घालून तरुणाई व पुरुष मंडळी असे चित्र दिसत होते .

तसेच शोभायात्रेच्या मिरवणुकीमध्ये ३० , ००० ते . ३५ , ००० हजार जनसमुदाय उपस्थित होता.

मा . (श्री . गणेश जवादवाड) वरिष्ठ पोलीस निरीक्षक डोंबिवली , पोलीस स्टेशन आणि मा . (श्री . श्रीराम विलासराव पाटील) सहायक पोलीस निरीक्षक श . वा . शा . डों . यांच्या मार्गदर्शनाखाली
मिरवणूक कार्यक्रम दरम्यान योग्य तो पोलिस बंदोबस्त तैनात करुन
संपूर्ण कार्यक्रम शांततेत पार पडला , फडके रोड येथील सर्व कार्यक्रम १४ : ०० वाजता समाप्त करुन
गुढीपाडवा उत्सव आनंदात साजरा करण्यात आला .


https://youtu.be/-Ojq9dyvK7E?feature=shared

79
3937 views