logo

स्व नरसिंगराव बोडखे विद्यालय धोडप बु. येथे संस्थापक अध्यक्ष स्व. भगवानरावजी गायकवाड साहेब यांची पुण्यतिथी साजरी

स्व नरसिंगराव बोडखे विद्यालय धोडप बु. येथे संस्थापक अध्यक्ष स्व. भगवानरावजी गायकवाड साहेब यांची पुण्यतिथी ..

रिसोड, येथून जवळच असलेल्या धोडप बु. येथील स्व. नरसिंगराव बोडखे विद्यालयात संस्थापक अध्यक्ष स्व. भगवानरावजी गायकवाड साहेब यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक सज्जनराव बाजड व प्रमुख पाहुणे संस्थेचे सचिव संतोषराव गायकवाड यांच्या शुभहस्ते स्व. नरसिंगराव बोडखे व संस्थापक अध्यक्ष स्व. भगवानरावजी गायकवाड साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यानंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक सज्जनराव बाजड यांनी स्व. साहेबांच्या जीवन कार्याविषयी व त्यांच्या सामाजिक कार्या विषयी माहिती सांगितली तर संस्थेचे सचिव संतोषराव गायकवाड यांनी साहेबांची दूरदृष्टी व समाजाला सोबत घेऊन चालण्याचे कार्याचा वसा पुढे चालू ठेवू असे सांगितले.तसेच शाळेतील शिक्षक दिलीप भिसडे यांनी साहेबांनी धोडपसरख्या छोट्याशा खेड्यात शाळा रुपी वटवृक्ष लावून गोरगरीब मुला मुलीसाठी शिक्षणाची दारे उघडी करून दिली म्हणून कित्येक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत असे सांगितले. अनंत बोडखे व सुधीर धांडे यांनी साहेबांना आदरांजली अर्पण केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकृष्ण रहाटे यांनी केले. व आभार प्रदर्शन विजय आढाव यांनी केले. कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि बहुसंख्य विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली होती.

79
2159 views
  
1 shares