logo

खापर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची 134 वी जयंती निम्मित जयंती उत्सव समिती गठीत..*

*खापर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची 134 वी जयंती निम्मित जयंती उत्सव समिती गठीत..*
अक्कलकुवा प्रतिनिधी: गंगाराम वसावे
खापर येथे महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती साजरी करण्यासाठी खापर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवनात झालेल्या बैठकीत जयंती उत्सव समिती गठीत करण्यात आली, यात अध्यक्षपदी आयु.जयराज जगन्नाथ साळवे यांची निवड करण्यात आली.
उपाध्यक्षपदी आयु.जितेंद्र सीताराम अहिरे सचिव आयु.शशिकांत बापू नगराळे तर खजिनदार महेश सुपडू पवार यांची निवड करण्यात आली. तर सल्लागार म्हणून आयु.पितांबर कापूरे,मधुकर कापूरे, किरण मगर, छगन पवार हे मार्गदर्शन करतील.
याबैठकीत मागील वर्षीचा हिशेब उत्कृष्ट रित्या उद्देश कापूरे यांनी सादर केला. यावेळी धनराज पवार,योगेश पवार,सागर कापुरे,कमलेश पवार, राकेश कापूरे,आशुतोष कापूरे, भटू सामुद्रे,प्रणय गुलाले,राहुल गुलाले समीर गुलाले,नितीन बागुल,उद्देश कापुरे,गौतम गवळे,विलास पवार ई.सदस्यपदी निवड झाली.
बैठकीत जयंती मिरवणुकीचे नियोजन संदर्भात चर्चा करण्यात आली.यावेळी समाज बांधव व युवक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

8
961 views