logo

सावनेर येथे सम्राट अशोक जयंती निमित्त बी.पी.एस. कडून आयोजित राष्ट्रीय वार्षिक महासंमेलनात सम्राट अशोकाची जयंती " राष्ट्रीय पर्व " म्हणून घोषित व्हावी असा एकमताने ठराव मंजूर

सावनेर
भारतीय परिवर्तनवादी संघ - राष्ट्रीय जन-जागरण मिशन च्या वतीने दिनांक ५ एप्रिल २०२५ रोजी सावनेर शहरातील राम गणेश गडकरी सभागृहात भारत भाग्य विधाता चक्रवर्तीं महासम्राट अशोक महान ( मौर्य ) यांच्या जन्मोत्सव "अशोकाष्टमी" निमित्य आयोजित राष्ट्रीय वार्षिक महासंमेलनात सर्वसंमतीने सम्राट अशोकाची जयंती " राष्ट्रीय पर्व " म्हणून घोषित व्हावी , हा ठराव मंजूर करण्यात आला. आता या ठरावाची प्रत भारत सरकारच्या राष्ट्रपती व प्रधानमंत्री कार्यालयासोबतच महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा पाठवली जाणार आहे . बी.पी.एस. द्वारे मागील तीन वर्षात शेकडो लोकसेवेची कार्य करण्यात आली आहे . या वर्षी भारतीय परिवर्तनवादी संघाची तीन यशस्वी वर्ष पूर्ण झाले आहेत. सम्राट अशोक विजयादशमीला स्थापनेच्या वेळी करण्यात आलेल्या संकल्पाला धरून भारतीय परिवर्तनवादी संघाच्या राष्ट्रसेवक , राष्ट्रसेविका व प्रचारकांनी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली . सोबतच भारतीय महामानवांच्या महान विचारांचा प्रचार - प्रसार देशातील गाव - खेड्यात शहरात केला जातो . आगामी काळात भारतीय परिवर्तनवादी संघाच्या राष्ट्रसेवक व राष्ट्रसेविकां व प्रचारकांना भारतीय समाजातील गोर - गरीब - शोषित - वंचित - वर्गाच्या सामाजिक , आर्थिक , शैक्षणिक व सांस्कृतिक उद्धारासाठी महत्वपूर्ण योगदान द्यावे लागणार आहे . त्याकरिता " राष्ट्रधर्म पथ " या धोरणाचे पालन करावे लागेल , असे प्रतिपादन भारतीय परिवर्तनवादी संघ - राष्ट्रीय जन - जागरण मिशनचे संयोजक व मुख्य प्रचारक भा.मयूर नागदवणे यांनी उपस्थितांशी संवाद साधताना सांगितले . यावेळी महासंमेलनात प्रामुख्याने उपस्थित सहायक आयुक्त सामाजिक न्याय विभाग मा. सिद्धार्थ गायकवाड, परिवर्तनवादी विचारवंत जेष्ठ प्रबोधनकार मा. अभिविलास नखाते , मा. गुजाजी बरडे , मा. नीलकंठ यावलकर , मा. आचार्य सुधाकर चौधरी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले . यावेळी माजी नगर उपाध्यक्ष सावनेर मा. गोपालजी घटे , माजी जि.प. सदस्य बैजनाथ डोंगरे , मा. पंकज घाटोळे , मा. संजय दहाट , मा. सचिन आठवले , मा. दिनेश इंगोले , मा. भगवान चांदेकर , मा. सुभाष मचले , मा. उत्तमजी बलवीर , मा. संदीपजी गोंडुळे, मा. रोशन राऊत आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती . कार्यक्रमाची प्रस्तावना बी.पी.एस. प्रचारक मा. प्रतापजी साळवे , संचालन मा. सुनीता गजभिये तर आभार मा. श्यामराव डांबरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशश्वी होण्याकरिता राष्ट्रसेवक गणपती पठाणे , सुभाष गजभिये , धनेश्वर ढोके , विनोद नॅसकॉल , सुरज निकोसे , विकास मेश्राम, मनोजकुमार बागडे , दादाराव लांजेवार , राहुल राऊत , शांताराम ढोके , अनिल ढोक , गौतम पाटील व राष्ट्रसेविका संगीता ढोक व ज्योती सोनटक्के आदीनी अथक परिश्रम केले .

135
7070 views