
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभाग "अजितपर्व - पदाधिकारी संपर्क अभियान" संपन्न्*
काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष ना.श्री.अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वात व प्रदेशाध्यक्ष खासदार श्री.सुनीलजी तटकरे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार ओबीसी विभागाच्या वतीने सुरू असलेल्या "अजितपर्व - पदाधिकारी संपर्क अभियान" अंतर्गत बुलढाणा जिल्हा ओबीसी विभागाची बैठक चिखली येथे श्रीराम नागरी पतसंस्थेच्या सभागृहात संपन्नं झाली.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सिंदखेडराजा मतदार संघाचे तरुण , तफडदार लोकप्रिय आमदार श्री.मनोजजी कायंदे होते तर प्रमुख् मार्गदर्शक म्हणून श्री कल्याणजी आखाडे प्रदेशाध्यक्ष ओबीसी विभाग हे लाभले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ऍड.नाझेरभाई काझी, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा विदर्भ प्रभारी श्री.राजुभाऊ गुल्हाने यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष श्री.शंतनू बोन्द्रे, जिल्हा उपाध्यक्ष श्री.मनोज दांडगे, ओमप्रकाशजी भुतेकर ,युवक प्रदेश सचिव श्री.शेखर बोद्रे, युवक अध्यक्ष श्री.मनीष बोरकर तसेच ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष तथा बैठकीचे निमंत्रक श्री.सुभाष देव्हडे यांची मंचावर उपस्थिती होती.
आपल्या प्रास्तविकामध्ये ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष तथा बैठकीचे निमंत्रक श्री.सुभाष देव्हडे यांनी मागील शासनाच्या कार्यकाळामध्ये बुलडाणा जिल्हा ओबीसी विभागाव्दारे केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडतांना प्रामुख्याने ओबीसी विभागामार्फत १५ दिवसांमध्ये मेरा खुर्द येथील शेती अधिग्रहण झालेल्या जमीनीचा ५ कोटी रुपये इतका मोबदला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला , तसेच ओ बी सी समाजाची जनगणना करण्यात यावी , समाजाच्या अनेक मागण्यासांठी प्रसंगी रस्यासेवर येऊन आंदोलन केले असल्याचे स्पष्टं केले. तालुक्यातील भरोसा येथील गावामध्ये दिडशे कार्यकर्त्यांचा ओबीसी विभागामाध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये भव्य प्रदेश करुन घेण्यात आला. तसेच मेरा खुर्द येथे १०१ कार्यकर्त्यांचा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाच्या वतीने करण्यात आला. चिखली येथील सुभाष नगर भागामध्ये ११०० केव्ही च्या विदयुत तारेला स्पर्श होऊन ५० टक्के भाजलेल्या युवकाला न्याय मिळवून देण्यासाठी व तथील जवळपास २० घरांच्या वरुन जात असलेली ही ११०० केव्ही ची लाईन हटवण्यासाठी आंदोलन करण्यात आले. त्याचाच परिपाक म्हणून न प चिखली ला ४ लाख ४७ हजार रुपयांचा निधी महावितरण कंपनीला देण्यास भाग पाडून सदर ११०० केव्ही विदयुत लाईन चा प्रश्न कायमचा निकाली काढला. याबद्दल त्या नागरिकांच्या वतीने सत्कार देखील करण्यात आला. बुलडाणा येथे जिल्हा अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये ओबीसी युवकांच्या अनेक समस्यांसाठी ठिय्या आंदोलन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी ओबीसी विभागाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष श्री ईश्वरची बाळबुधे साहेब तसेच जिल्ह्याचे माजी मंत्री तथा जिल्ह्याचे नेते डॉ राजेंद्रजी शिंगणे साहेब यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. तसेच नांदुरा येथे ओबीसी विभागाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना भेडसावण्याऱ्या विविध समस्यांसाठी तहसिल कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. बुलडाणा जिल्ह्यातील तेरा ही तालुक्यांमध्ये जवळपास १५ ते २० वेळा संपूर्ण तालुक्यामध्ये संपर्क अभियानाच्या माध्यमातून कार्यकर्ता जोडो अभियान राबविण्यात आले. संग्रामपूर तहसिल कार्यालय येथे खाऱ्या पट्याच्या समस्यानिवारण करण्यासाठी तात्काळ निधी व उपाययोजना करण्यात याव्या या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करुन सरकारचे लक्ष वेधण्याचे काम ओबिसी विभागाच्या माध्यमातून करण्यात आले. शासनाने तूर खरेदी बंद केल्यामुळे संतप्तं झालेल्या शेतकरी बांधवांसह चिखली तहसिल कार्यालयामध्ये तूर फेकून आंदोलन करण्यात आले. तर शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनाच्या विरोधात छेडलेल्या घुगऱ्या आंदोलनाची दखल अनेक टि व्हि चॅनलने देखील घेतल्याचे आपल्या प्रास्तविकामध्ये ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष तथा बैठकीचे निमंत्रक श्री.सुभाष देव्हडे यांनी सांगीतले. तर अशा प्रकारची अनेक आंदोलने आतापर्यंत छेडून शेतकरी व युवक , माता भगिणी यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्नं केला असल्याचे सांगून यापुढेही आपण जनतेसाठी सदैव उपल्बध असू आश्वासनदेखील विभागाचे जिल्हाध्यक्ष तथा बैठकीचे निमंत्रक श्री.सुभाष देव्हडे यांनी यावेळी दिले.
या वेळी प्रदेशाध्यक्ष ओबीसी विभाग कल्याणजी आखाडे साहेब यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना संघटनात्मक बांधणी विषयी मार्गदर्शन करताना सर्व समाज घटकांना सोबत घेऊन न्याय देणारे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष ना.श्री.अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भक्कम करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष खासदार श्री.सुनीलजी तटकरे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार पक्षासोबत ओबीसी समाज जोडण्यासाठी ओबीसी सेलच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.
तर ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री राजुजी गुल्हाने यांनी कार्यकर्त्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. जिल्हाध्यक्ष ॲड नाजेरकाझी साहेब यांनी बैठकीला मार्गदर्शन करतांना आज आपण सत्तेत असलो तरी कार्यकर्त्यांनी जनतेमध्ये जाऊन त्यांच्या अडचणी समजून ते सोडविण्यासाठी प्रयत्नं करावेत असे सांगत ओबीसी विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या विविध आंदोलनाचे कौतुक केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये आ. मनोजजी कायंदे साहेबांनी संघटनात्म्क बांधनी करतांना समाजातील शेवटच्या घटकाला जोडण्याचे कार्य कार्यकर्त्यांनी केले पाहिजे. कारण पक्षाची ध्येयधोरणे सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी कार्यकर्ता हा पक्ष व जनतेमधील दुवा असून पक्षासाठी काम करणाऱ्या निष्ठावांन कार्यकर्त्यांच्या पाठीशी पक्ष कायमच उभा राहिल अशी ग्वाही दिली. बैठकीचे सुत्रसंचालन प्रशांत एकडे यांनी तर आाभारप्रदर्शन भागवत थुट्टे यांनी केले.
बैठकीच्या यशस्वीतेसाठी विभागाचे जिल्हाध्यक्ष तथा बैठकीचे निमंत्रक श्री.सुभाष देव्हडे यांच्या मार्गदर्शनामध्ये नदिम देशमुख , प्रविण घडयाळे , विशाल थुट्टे , दिपक अंभोरे , ज्ञानेश्वर जाधव , शंकर महाराज यांच्यासह अनेक कार्यकत्यांनी परिश्रम घेतले.