
कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन बागलाण टीम च्या वतीने चैत्र पौर्णिमेनिमित्त सप्तशृंगी मातेची पायी वारी करणाऱ्या भक्तांना पाणी व खाऊ वाटप*
*कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन बागलाण टीम च्या वतीने चैत्र पौर्णिमेनिमित्त सप्तशृंगी मातेची पायी वारी करणाऱ्या भक्तांना पाणी व खाऊ वाटप*
दिनांक ८/४/२०२५ वार मंगळवार रोजी, कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन बागलाण टीमच्या वतीने चैत्रपौर्णिमे निमित्ताने सप्तशृंगी गडावर पायी वारी करणाऱ्या भक्तांना गणपती मंदिर ठेंगोडा या परिसरात पाणी बॉटल व खाऊचे वाटप करण्यात आले.
*माणसाने माणसासारखं जगण्यासाठी*,
*कधीकधी बाळ व्हावं, हरवलेल्या गर्दीतही* *विचारांची नाळ व्हावं*,
*आपण एक बीज व्हावं*, *पेरून उगवण्यासाठी*,
*परत पुन्हा कोंब व्हावं* "*उगवून पेरण्यासाठी*,
"*मला वाटतं उगवणही* *त्यालाच जमून जातं*, "*इतरांच्या आनंदात*,
*ज्यांचं मन रमून जातं*
इतरांच्या आनंदातही आनंद शोधता यायला पाहिजे. अन्नदान हे सर्व दानात श्रेष्ठ दान मानले गेले आहे, याच उद्देशाने, कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन बागलाण टीमने चैत्र पौर्णिमे निमित्ताने सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी पायी जात असलेल्या भक्तांना पाणी बॉटल व खाऊचे वाटप केले. यासाठी सन्माननीय पुष्पलताताई पाटील यांनी ५०० बिस्कीटचे पुडे घेऊन दिले, सन्माननीय तृप्ती ताई कुवर यांनी १०० राजगिऱ्यांच्या लाडूंचे पॉकेट आणले, बागलाण टीमचे मार्गदर्शक सन्माननीय अरविंद तात्या सोनवणे यांनी ५० पाणी बॉटल चे बॉक्स दिले, सन्माननीय पूजाताई दंडगव्हाळ व ज्योतीताई ठाकरे, वैशालीताई सोनवणे, मनीषाताई पांडे यांनी ५० डझन केळी घेऊन दिल्या, सर्व भगिनी एकत्रित ठेंगोडा येथे गणपती मंदिराजवळ चार वाजता उपस्थित राहिल्या आणि पायी चालणाऱ्या भक्तांना या सर्व वस्तूंचे वाटप केले. हे वाटप करत असताना अतिशय नम्रपणे या सर्व भगिनींनी काम केले, त्यामध्ये ज्योतीताई ठाकरे, पुष्पलताताई पाटील, वैशालीताई सोनवणे, पूजाताई दंडगव्हाळ, मनीषा ताई पांडे, पौर्णिमा शिवदे, शारदा जाधव, राजश्री पंडित या सर्वांनी यासाठी मेहनत घेतली, सर्व वस्तूंचे विनम्रतेने वाटप करण्यात आले त्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते, व लाभ घेणाऱ्यांच्या चेहऱ्यावरही आनंद ओसंडून वाहत होता,
म्हणूनच म्हणावेसे वाटते की
*नम्रता देते सदा जगण्याला बळ*
*चाचपता येतो खोल काळाचाही तळ*
यापुढेही असेच सहकार्य व विनम्रता आपल्या कार्यामधून दिसावी अशी अपेक्षा व्यक्त करून सर्वांनी अनमोल असे सहकार्य केले त्याबद्दल बागलाण तालुका अध्यक्ष वैशाली सोनवणे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩