
केंद्रीय कृषी मंत्र्यांची नंदुरबार कृषी विज्ञान केंद्राला भेट...
*निर्धूर चूल आणि सुर्यदर्शन सिताफळ प्रक्रिया उद्योगाचे केले कौतुक..*
----------------------------------------------
*Social Media Activist*
*उदेसिंग पाडवी नंदुरबार (MH)*
----------------------------------------------
*दिनांक- 7 एप्रिल 2025 रोजी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी डॉ.हेडगेवार सेवा समिती संचलित कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार येथे दिनांक- 7 रोजी भेट दिली.* *या भेटीदरम्यान त्यांनी कृषी क्षेत्रातील विविध नवीन उपक्रम आणि प्रगतीची माहिती घेतली विशेषता त्यांनी सुर्यदर्शन शेतकरी प्रोड्युसर कंपनी लि.कात्री यांच्या प्रदर्शनाला भेट देऊन निर्धूर चूल प्रक्रिया आणि सिताफळ पल्प निर्मितीच्या कार्याचे कौतुक केले.* *सूर्यदर्शन शेतकरी प्रोड्युसर कंपनीच्या अध्यक्ष अनिता संदीप वळवी आणि सदस्य गौरी वळवी यांनी केंद्रीय मंत्र्यांना निर्धूर चुलीच्या वापराचे महत्त्व समजावून सांगितले.* *व निर्धूर चुलीच्या निर्मिती आणि वापरासाठी कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार वेळोवेळी तांत्रिक मार्गदर्शन पुरवते असे सांगण्यात आले.* *या प्रसंगी कृषी विज्ञान केंद्राचे तज्ञ डॉ.राजेंद्र दहातांडे सर,होमसायटिस्ट डॉ.आरती देशमुख आणि कात्रीचे सरपंच संदिप वळवी उपस्थित होते.*
*या दरम्यान केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चव्हाण यांच्या स्वागतासाठी कात्री येथील पारंपरिक होडी नृत्याचे आयोजन करण्यात आले होते.* *या नृत्यात सहभागी होऊन केंद्रीय मंत्र्यांनी स्थानिक कलाकारांच्या उत्साह वाढवला. एकंदरीत केंद्रीय कृषी मंत्र्यांची नंदुरबार कृषी विज्ञान केंद्राची भेट महत्त्वपूर्ण ठरली.*