logo

साखरखेर्डा येथील एस ई एस हायस्कूलच्या मुली अव्वल स्थानी

साखरखेर्डा येथील एस ई एस हायस्कूलच्या मुली अव्वल स्थानी

प्रतिनिधी जुबेर शाह
Aima media network..... sindkhed Raja

साखरखेर्डा:क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रिडा परिषद तथा जिल्हा क्रिडा अधिकारी यवतमाळ यांच्या वतीने राज्यस्तरीय शालेय मोन्टेक्स बाॅल क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते . त्यात साखरखेर्डा येथील एस ई एस हायस्कूलच्या मुलींनी अव्वल स्थान कायम ठेवीत ही स्पर्धा जिंकली . त्या विद्यार्थीनींचा सत्कार ७ एप्रिल रोजी संस्थेच्या वतीने करण्यात आला .
महाराष्ट्र राज्य मोन्टेक्स बाॅल क्रिकेट सामन्यांचे आयोजन ४ व ५ एप्रिल रोजी के पी एल क्रिकेट मैदान कळंब जिल्हा यवतमाळ येथे करण्यात आले होते . सेमी फायनल मध्ये मुंबई विभागाशी अमरावती विभागात लढत झाली असता साखरखेर्डा येथील मुलींनी प्रथम बाॅलिंग करीत ५ ओव्हर मध्ये ३६ रनावर मुंबई संघाला रोखले . आणि ३ ओव्हर मध्ये एकही विकेट न गमावता ३६ रनचे टार्गेट पूर्ण करुन सेमी फायनल जिंकत अंतीम सामन्यात प्रवेश मिळविला . फायनल सामना नाशिक विभागाशी झाला असता तो सामनाही एकतर्फी जिंकत अमरावती विभागातील एस ई एस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय साखरखेर्डा मधील १९ वर्षीय मुलींनी राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा जिंकली . अमरावती विभागातील एस ई एस हायस्कूलचा संघ आता राष्ट्रीय पातळीवर खेळणार आहे . मुलींनी राज्यस्तरीय क्रिकेट सामन्यांत मिळविलेल्या यशाबद्दल आज ७ एप्रिल रोजी साखरखेर्डा ग्रामस्थांनी भव्य मिरवणूक काढली . त्यानंतर ठाणेदार गजानन करेवाड यांच्या अध्यक्षतेखाली आणि सरपंच सौ . ज्योती अमित जाधव , माजी प्राचार्य डी एन पंचाळ , माजी सरपंच कमलाकर गवई यांच्या प्रमुख उपस्थितीत मुलींचा सत्कार करण्यात आला .राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेतील मुलींचा संघ
कॅप्टन वैष्णवी अनिल धनलोभे , गौरी विजय जाधव , ज्ञानेश्वरी भगवान टाले , आनंदी प्रविण कामे , प्रगती योगिनाथ राऊत , श्रावणी संदीप जाधव , प्रिती नकुल शिरसाट , भाग्यश्री विजय मंडळकर , स्नेहा संदीप रनमळे , अक्षरा दत्तात्रय लष्कर , गौरी शत्रुघ्न तुपकर , शिवानी देवलिंग किर्तनकर , आरुषी गणेश कठाळे , अनुष्का गजानन वानेरे या १४ मुलींनी भाग घेतला होता .यावेळी संस्थेचे सचिव चंद्रशेखर शुक्ल , संचालक डॉ अभिषेक शुक्ल , प्राचार्य विलास ठाकूर , क्रिडा शिक्षक किशोर कामे , मगन रबडे , कु . एस एन सरकटे , कु . उज्वला कुळकर्णी , समाधान पाझडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले . आजच्या गुणगौरव सोहळ्याला तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संतोष मंडळकर , गणेश कठाळे , देवानंद खंडागळे यासह पालक उपस्थित होते . कार्यक्रमाचे संचालन दर्शनकुमार गवई यांनी केले .

0
191 views