logo

क्रांतिवीर बाबुराव पुल्लेसुर शेडमाके यांच्या जयंती उत्सव सोहळानिमित्त आज किनवट येथे भव्य गोंडी ढेमसा स्पर्धेच आयोजन.

किनवट - क्रांतिवीर बाबुराव पुल्लेसुर शेडमाके यांच्या जयंती सोहळानिमित्त भव्य गोंडी ढेमसा स्पर्धेच आयोजन आज दिनांक 10/ एप्रिल / 2025 रोजी सायंकाळी ठीक 6:00 वाजता हुतात्मा गोंडराजे शंकर शहा रघुनाथ शहा विचारमंच मैदान किनवट येथे आयोजित करण्यात आले असुन लाखो रुपयांचे बक्षीस या ठिकाणी ठेवण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटक लोकप्रिय आमदार भीमरावजी केराम, असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सभापती माधवरावजी मरस्कोल्हे राहणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी विकासमंत्री अशोक उईके, खासदार आदिलाबाद नागेशजी घोडाम, माजी शिक्षण मंत्री वसंतरावजी पुरके, आर्णी / केळापूर मतदारसंघाचे आमदार राजूभाऊ तोडसाम व अनेक मान्यवर मोठया संख्येने उपस्थित राहणार आहेत.
किनवट / माहूर परिसरातील तमाम आदिवासी बांधव लाखोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान भव्य गोंडी ढेमसा स्पर्धेचे अध्यक्ष संतोष मरस्कोल्हे, बालाजी सिडाम, शिवा सिडाम, ओम आडे, सुखदेव सलाम, अनिल कन्नाके, आशिष उर्वते, अरुन मडावी, विजय मडावी, देवेंद्र कोवे, दत्ता भिसे, राम लोखंडे, संतोष कन्नाके, अरविंद पेंदोर यांनी केले.

14
3002 views