logo

हाजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला विवाह सोहळा शिरूर ताजबंद येथील श्री महादेव मंदिराच्या यात्रेला २५० वर्षांची परंपरा ११व्या शतकातील शिरूर ताजबंद येथील श्री महादेव मंदिर.आज हाजारो भाविकांना दिला जातो महाप्रसाद

हाजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला विवाह सोहळा शिरूर ताजबंद येथील श्री महादेव मंदिराच्या यात्रेला २५० वर्षांची परंपरा
११व्या शतकातील शिरूर ताजबंद येथील श्री महादेव मंदिर.
आज हाजारो भाविकांना दिला जातो महाप्रसाद .

शिरूर ताजबंद ( बालाजी पडोळे / शिवाजी श्रीमंगले ) लातूर जिल्हयातील
शिरूर ताजबंद येथील श्री महादेव मंदिर हे अकराव्या शतकापूर्वीचे असून अकराव्या शतकाच्या उत्तरार्धात या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्याचा उल्लेख या ठिकाणी असलेल्या शिलालेखात सापडतो. त्यानंतर तत्कालीन भौगोलिक परिस्थिती मुळे कदाचित हे मंदिर लुप्त झाले असावे असे सांगितले जाते.
यात्राकाळात विविध धार्मिक कार्याक्रमचे आयोजन करण्यात आले आले आहे. शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण , 7 दिवस विविध महाराजांचे कीर्तन झाले .एकादशी च्या दिवशी पालखी मधून काठी कावडी सोबत महादेवाची मूर्ती मंदिरा मध्ये प्रवेश करते , द्वादशी ला महादेवाचे व पार्वतीचा विवाह सोहळा मानकरी रणधीर पाटील व काठी कावडीचे मानकरी व भाविकभक्त यांच्या साक्षीने लावला जातो व दुसऱ्या दिवशी खीर, हुलपली व भाताचा महाप्रसाद असतो . हनुमान जयंतीला काठी कावडी सोबत देव गावात जातात व यात्रेची सांगता होते. यात्रे दरम्यान गावातील , कामानिमित बाहेरगावी असलेले नागरिक व बाईलेकी यावेळी महादेवाची पूजा मांडण्यासाठी गावाकडे येतात व सहकुटुंब पूजा मांडतात गहू किवा तांदुळाची रास मांडून त्यावर खोबराचा खोबळा ठेवून चाफ्याच्या फुलांनी पूजा मांडली जाते .
शिरूर ताजबंद येथील श्री महादेव मंदिर देवस्थानचे अध्यक्ष सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील आहेत. या मंदिरातील महादेवाचे पिंड ही स्थापित नसून स्वयंभू आहे. या महादेव मंदिरातील शिवलिंगाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथील पिंडीभोवती कायम पाणी असते, हे सुद्धा एक वेगळेपण आहे. या मंदिरास २५० वर्षांच्या यात्रेचा इतिहास आहे. या मंदिरावर अनेक पंचक्रोशीतील भाविकांची श्रद्धा आहे.
शिरूर ताजबंद येथील श्री महादेव मंदिर हे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या भागातील नागरीक सर्व शुभ कार्याची सुरुवात श्री महादेवाची पूजा करूनच करतात.
लातूर जिल्ह्यात अनेक प्राचीन शिवमंदिरे आहेत. प्रत्येकाच्या अनोख्या अशा आख्यायिका आहेत. यामधील एक असलेले शिरूर ताजबंद येथील श्री महादेव मंदिराचा उल्लेख होतो. साधारणपणे सहाशे वर्षांपूर्वी या ठिकाणी एक शेतात नांगरत असताना त्याच्या नांगराला महादेवाची पिंड लागली. शेतकऱ्याने ती पिंड वर काढली. नांगरताना त्या पिंडीला नांगराचा जो व्रण उठला आहे. तो आजही या ठिकाणी असलेल्या महादेवाच्या पिंडीवर व्रण आढळतो.मंदिर सभोवताली प्रसादाचे स्टॉल्स, खेळणे पाळणे आल्याने यात्रा मोठी भरत आहे . मंदिर शेजारी शिवपार्वती मंगल कार्यालय भव्य असून या ठिकाणी मोठया प्रमाणात कार्यक्रम पार पडतात . मंदिर कमीटीचे कार्यकारी मंडळ भजनी मंडळ, गावातील व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते तरुण पिडी भाविक भक्त व्यवस्थापक शिवाजीअप्पा स्वामी यात्रा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतात .

47
4586 views