logo

बाबानगर, जवाहर नगरमध्ये मुख्य नाला फुटल्याने नागरिकांच्या जिवितास धोका – प्रशासनाची उदासीनता!

नांदेड (प्रतिनिधी):
शहरातील मुख्य नाला जो श्रीनगर, पोलीस कॉलनी, हर्ष नगर, जवाहर नगर येथून आनंदनगर कडे जाणारा नाला सध्या गंभीर अवस्थेत असून, त्यामधील एक मोठा भाग फुटला आहे. या फुटलेल्या नाल्यामुळे संपूर्ण परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

या नाल्याच्या आजूबाजूला कोणतीही संरक्षक भिंत किंवा चेतावणी फलक नसल्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः रात्रीच्या वेळी कुणीही यात पडल्यास जीवितहानी होऊ शकते.

स्थानिक नागरिकांच्या सांगण्यानुसार, जवळच सुरू असलेल्या बांधकामाच्या वाहनांमुळे हा नाला फुटला आहे. पावसाळ्याच्या तोंडावर ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून, पावसाचे पाणी थेट घरांमध्ये घुसण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे संसर्गजन्य आजार पसरू शकतात आणि लोकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.

स्थानिक प्रशासन याची तातडीने दखल घेऊन आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अन्यथा एखादा मोठा अनर्थ घडल्यास जबाबदार कोण? असा सवाल नागरिक विचारत आहेत.

6
2564 views