logo

संकट मोचन हनुमान मंडळ शहाड प . यांच्या वतीने हनुमान जयंती उत्साहात साजरी ,

शहाड - हनुमान जयंती हा एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय सण आहे जो भगवान हनुमानाला समर्पित आहे. हनुमान जयंती संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने व भक्ती भावाने साजरी होते. 12 एप्रिल रोजी हनुमान जयंतीच्या दिवशी संपूर्ण भारतासह महाराष्ट्रात देखील उत्साह पाहायला मिळाला. विविध ठिकाणी बजरंगबलीची विधिवत पूजा केली जाते आणि त्याच्या आवडत्या वस्तू त्याला अर्पण केल्या जातात. शहाड पश्चिम येथे देखील हनुमान जयंती मोठ्या उत्साहात व भक्ती भावाने साजरी करण्यात आली. पंधरा वर्षापासून दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. होम हवन , भजन व किर्तन करून , पवनसुत हनुमान की जय , बजरंग बली की जय या जयघोषाने भाविकांनी जयंती साजरी केली . भक्तांसाठी महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते अशी माहिती संकट मोचन हनुमान मंदिराचे अध्यक्ष सुरेश भाऊ जाधव यांनी दिली.

0
45 views