नांदेड शहरात श्री हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी .
आज दिनांक 12/04/2025 रोजी हनुमान जयंती निमित्त नांदेड शहरात जुना मोंढा टॉवर पासून श्री हनुमान जन्मोत्सव समिती बागेश्वर धाम नांदेड क्षेत्र यांचे मार्फत भव्य मिरवणूक काढण्यात आली होती त्यात समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते तसेच नांदेड शहरातील असंख्य रामभक्त देखील मिरवणुकीत सहभागी झाले होते . या वेळेस संपूर्ण नादेड शहरात हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली असुन जागो जागी महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते . त्यामध्ये असंख्य नागरिकांनी श्री हनुमान जयंतीच्या महाप्रसादाचा लाभ घेवून संपूर्ण शहरात धार्मिक पद्धतीचे वातावरण निर्माण झाले होते .