logo

आम्ही खोपोली कर आमचं ठरलय संघटनेच्या वतीने थोर समाज सुधारक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या १९८ जयंती निमित्त खोपोली मध्ये साजरी करण्यात आली.

*खोपोली - 11 एप्रिल थोर समाज सुधारक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या १९८ जयंती निमित्त खोपोली मधील माजी नगराध्यश, माजी नगरसेवक तसेच विविध सामाजिक संस्था अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते ह्यांनी केलेल्या आव्हानाला तसेच महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव कमिटी ह्यांनी नियोजनबद्ध घेतलेल्या मेहनत व पुढाकारच्या सहाय्याने आम्ही खोपोली कर आमचं ठरलय संघटनेच्या वतीने मागील काही वर्षा पासून काढत असलेल्या रथ व बाईक रॅलीला आज खऱ्या अर्थाने खोपोली मधील विविध जाती धर्माचे नागरिक सुरवातीपासून शेवट पर्यंत उपस्थित राहून मोठ्या उत्साहाने महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी केली त्या बद्दल सर्वप्रथम सर्वांचे आभार.*

*महाराष्ट्राचे आराध्य दैवत, रयतेचे राजे श्री. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ( शिळफाटा ) इथे ज्येष्ठ माजी नगरसेवक श्री. मोहनजी अवसरमल साहेब, माजी नगरसेवक श्री. राजेंद्र फक्के साहेब, माजी नगरसेवक श्री. कुलदीपक शेंडे तसेच ज्येष्ठ पत्रकार समता सैनिक श्री. दिनकर भुजबळ साहेब, सो. वर्षा मोरे नागरी सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष ह्यांनी पुष्पहार अर्पण करून नंतर आम्ही सर्वांनी श्री. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, तसेच क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले ह्यांचा विजय असो अश्या घोषणा देऊन महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेला श्रीमती सुरेखा ताई खेडकर राष्ट्रवादी कर्जत खालापूर मतदार संघ महिला अध्यक्ष व सो. ज्योती भुजबळ सामाजिक कार्यकर्त्या तसेच श्री. गणेश ठाकरे साहेब ह्यांनी पुष्पहार अर्पण करून महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मरणार्थ रथयात्रेची व बाईक रॅलीची सुरवात केली .*

*श्री. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक शिळफाटा ते खोपोली बाजारपेठेतून महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक खोपोली पर्यंत रथयात्रा व बाईक रॅली काढून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक इथे माजी नगराध्यश श्री. दत्ताजी मसुरकर साहेब, माजी नगरसेवक श्री. किशोर पानसरे साहेब, समाजकार्यात नेहमीच अग्रेसर असलेले श्री. मोहन केदार साहेब व इतर सर्व मान्यवर ह्यांनी पुष्पहार अर्पण करून आम्ही सर्वांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर तसेच महात्मा ज्योतिबा फुले ह्यांचा विजय असो अश्या घोषणा देऊन सांगता केली.*

*थोर समाजसुधारक महात्मा ज्योतीबा फुले ह्यांच्या बद्दल विविध मान्यवर ह्यांनी मनोगत व्यक्त करताना त्यांच्या कार्याला उजाळा दिला.*

*श्री. दत्ताजी मसुरकर साहेब --- महात्मा ज्योतिबा फुले ह्यांना वंदन करून ह्या देशात ज्यांनी शिक्षणाची मुहूर्त मोड रोवली, शिक्षणाची कवाडे उघडी केली ते थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले हे खऱ्या अर्थाने त्या काळातील टाटा, बिर्ला होते. त्यावेळेचे ते खूप मोठे उद्योगपती होते असे असूनही त्यांनी त्यांचे संपूर्ण जीवन हे समाजासाठी संमर्पित केले. इतकेच नव्हे तर त्यांची पत्नी सावित्री बाई फुले ह्यांनी ही त्यांचे जीवन हे समाजासाठी संमर्पित केले व आज आपण त्यांचे हे नाव अजरामर रित्या घेत आहोत.*

*अनेक उद्योगपती आले आणि गेले अनेक मोठी मंडळी झाली पण असे काही व्यक्ती आहेत ज्यांचे नाव त्रिकाल समाज घेत राहील त्यापैकी एक महात्मा ज्योतिबा फुले व सावित्री बाई फुले आहेत. त्यांच्या या जयंती निमीत मी त्यांना विनम्र अभिवादन करतो.*

*माजी ज्येष्ठ नगरसेवक श्री. मोहनजी अवसरमल साहेब --- आज संपूर्ण महाराष्ट्रात, देशात महात्मा ज्योतिबा फुले यांची १९८ जयंती साजरी होत असताना. ज्या महात्मा फुले नी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे उघडली आणि ज्या स्त्रिया शिकल्या शिकतात त्यांना जो मान सन्मान आहे त्याचे संपूर्ण श्रेय हे महात्मा ज्योतिबा फुले ह्यांना आहे.*

*महात्मा ज्योतिबा फुले ह्यांनी काय एक काम केले नाही तर श्री. छत्रपती शिवाजी महाराज ह्यांची पहिली जयंती साजरे करणारे तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी त्यावेळेला मिळत नव्हती ते शोधण्याचे काम महात्मा ज्योतिराव फुले यांनी केले. आणि म्हणून इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांना मानणारे महात्मा ज्योतिराव फुले महात्मा ज्योतिराव फुले यांचे विचार मानणारे शाहू महाराज आणि शाहू महाराज यांचे विचार मानणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे महाराष्ट्राचे शाहू, फुले, आंबेडकर ही महाराष्ट्रातली मोठ्या संतांची भूमी आहे त्यामुळे आपण ही जयंती साजरी करताना आपले कर्तव्य आहे की त्यांचे विचार हे सर्वांपर्यंत पोहचवण्याचे काम आणि आपल्या पुढील पिढीला जाणीव करून देण्याचे काम या महात्मांनी आपल्या साठी काय केले आहे ह्याची जाणीव करून देणे व त्यांच्या मुळेच आपण आज आपण इथे आहोत असे सांगितले.*

*ह्या ठिकाणी मी समाजाला आव्हान करेल की आम्ही मानतोय, आम्ही मानतोय म्हणजे आम्ही विचाराने मानतोय परंतु आजूनही काही समाज हा ओपन पने साथ देत नाही आहे. त्यांनी खूप मोठे कार्य केले आहे त्यामुळे त्यांनी उघडपणे साथ दिली पाहिजे. त्यांनी एका समाजासाठी काम न करता संपूर्ण समाजासाठी स्त्रियांसाठी खूप मोठे काम केले आहे त्यांचे कार्य अमाप आहे आपण या निमित्ताने सुरुवात केली मी मनापासून आयोजकांचे आभार मानतो.*

*माजी नगरसेवक श्री. राजेंद्र फक्के साहेब --- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती उत्सवाने आम्ही खोपोलीकर आमचं ठरलंय संघटनेच्या वतीने मागील काही वर्षापासून रथ यात्रा व बाईक रॅलीचे आयोजन करून उत्साहात साजरी करत असतो.*

*ह्या वर्षीचे वैशिष्ठ म्हणजे सर्व संघटना तसेच राजकीय पक्षाच्या लोकांनी तसेच खोपोली नगर परिषदेने खूप मोठे मोलाचे सहकार्य केले आणि न भूतो भविष्याती खूप मोठी रॅली ही काढण्यात आली.*

*खरोखरच अतिशय आनंद आणि खूप मोठा अभिमान वाटतो की महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य हे संपूर्ण जगाला कळले पाहिजे त्यासाठी सलग 3 रे वर्ष आम्ही खोपोलीकर आमचं ठरलंय संघटनेच्या वतीने मोठ्या दिमागामध्ये जयंती साजरी केली आहे.*

*माजी नगरसेवक श्री. किशोर पानसरे साहेब --- आज क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची 198 जयंती उत्सव आज खोपोली मध्ये सर्व समाज बांधवांनी आणि आयोजकांनी रथ यात्रा व बाईक रॅलीचे आयोजन केले आहे.*

*बऱ्याच वर्षापासून महात्मा फुलेंनी जे कार्य केले संपूर्ण महाराष्ट्रात महिलांसाठी शिक्षण चालू केले. सर्वप्रथम त्यांनी बोले त्यासी चाले त्याची वंदावी पावले प्रमाणे सर्वप्रथम त्यांनी त्यांच्या पत्नीला शिक्षण दिलं आणि मुलींची पहिले शाळा चालू केली असे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमीत खोपोली मधील तमाम नागरिकांना सर्वांना शुभेच्या देतो.*

*महात्मा फुले यांनी खऱ्या अर्थाने जे कार्य केले त्यावेळी ते खूप मोठे होते. त्यांनी त्यांची विहीर ही सर्वांसाठी खुली करून दिली. त्यावेळी स्त्रियांना दुय्यम स्थान होतं त्यांनी त्यावेळी बाल विवाहाला विरोध केला विधवा पुनर्विवाह ला समर्थन केलं असे क्रांतिकारी विचार आणि त्या अमलात आणण्याचे काम महात्मा ज्योतिराव फुले यांनी केले आज त्या महात्मा फुले जयंती निमीत जी रथयात्रा व बाईक रॅलीचे आयोजन खोपोली शहरांमध्ये केले पुढे भविष्यामध्ये खूप मोठ्या भव्य स्वरूपात रॅली नक्कीच होईल व आयोजकांना शुभेच्छा देतो असे बोलून आपले दोन शब्द संपवले.*

*श्रीमती सुरेखा खेडकर --- आज सर्व प्रथम मी महामानव क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमीत त्यांना अभिवादन करते.*

*आज खऱ्या अर्थाने मागील काही वर्षापासून काढत असलेली ही रथ यात्रा व बाईक रॅली चे भव्य स्वरूपात नियोजन झाले.*

*महात्मा फुले ह्यांच्या वर एक गान आहे. सावित्री बाई नसती तर मुलगी शिकली असती का आणि सरकारी हुद्यावर बसली असती का.*

*आज महिला ज्या काही वेगळ्या क्षेत्रात आहेत त्याचे एकमेव कारण म्हणजे महात्मा फुले. महात्मा फुले ह्यांनी सर्व प्रथम शिवाजी महाराज ह्यांच्या वर पोवाडा लिहिला तर त्यांची समाधी शोधण्याचे काम ही त्यांनीच केले.*

*अमेरिकेत जेव्हा काळे आणि गोरे असे शीत युद्ध सुरू होते त्यावेळी त्याला प्रस्तावना देत आणि त्याच्या विषयी पुस्तक लिहिणारे हे महात्मा ज्योतिबा फुले होते.*

*अश्या ह्या महापुरुषाला आपण कोणत्या तरी जाती मध्ये बांधतो व त्यामुळे ह्या महापुरुषाचे विचार सर्व जाती धर्मा पर्यंत पोहचत नाही. त्यामुळे कुठल्याही महापुरुषाला कुठल्याही जाती धर्मात न बांधता त्या महापुरुषाने समाजासाठी केलेले काय आहे हे जर आपण पाहिले तर खऱ्या अर्थाने आपण त्यांची जयंती साजरी केली असे मला वाटेल.*

*खोपोलीकर कुठल्याही जाती धर्माला न मानता आम्ही सर्व खोपोलीकर म्हणून सर्व जण एकत्र येऊन सर्व महापुरुषांच्या जयंती साजरी करतात त्यामुळे सर्व प्रथम खोपोलीकरांना ही धन्यवाद देते.*

*पुढच्या वर्षी ह्या पेक्षाही मोठ्या उत्साहाने महात्मा फुले यांची जयंती कश्या प्रकारे साजरी करता येईल महात्मा फुले यांचे कार्य कश्या प्रकारे लोकांपर्यंत पोहचू या साठी आपण सर्व प्रयत्न करू.*

*सो. सुवर्णा ताई मोरे --- सर्व प्रथम क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमीत सर्व खोपोलीकरांना शुभेच्या देते.*

*क्रांतिसूर्य म्हणजे खरच ज्योतिबा फुले हे सूर्या प्रमाणे होते आणि आज महिला ज्या आम्ही इथ पर्यंत पोहचलो आहे त्यात त्यांचे खूप मोठे योगदान आहे व त्याचे हे ऋण आम्ही कधीच फेडू शकत नाही.*

*आज प्रत्येक क्षेत्रात ज्या महिला आघाडीवर आहेत त्यासाठी त्यावेळी त्यांना प्रोत्साहित केले शिकवले ते फक्त आणि फक्त महात्मा ज्योतिबा फुले व आई सावित्री बाई फुले ह्यांच्यामुळे*

*सो. वर्षा मोरे --- नागरी सामाजिक विकास संस्था मार्फत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या रथ यात्रा व बाईक रॅली साठी जे आवाहन केले होते त्या प्रमाणे उत्तम प्रतिसाद मिळाला आहे त्यासाठी सर्व महिला, पुरुष व युवक ह्यांचे आभार मानते. व पुढच्या वर्षी दुप्पट संख्येने आपण सर्व उपस्थित राहू अशी आशा व्यक्त करते.*

*सो. ज्योती भुजबळ --- सर्व प्रथम सर्व खोपोली करांचे आभार मानते कारण दर वर्षी प्रमाणे ह्या वर्षी ही जी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मरणार्थ जी रथ यात्रा व बाईक रॅली काढली जाते त्यापेक्षा या वर्षी अमाप प्रतिसाद हा आजच्या रॅली साठी मिळाला त्यासाठी सर्व प्रथम सर्व खोपोली करांचे मनापासून आभार.*

*महात्मा ज्योतिबा फुले यांची 198 जयंती या साठी आज खोपोली मधील महिला व पुरुष ह्यांनी जो काही प्रतिसाद दिला आहे तो कौतुकास्पद आहे.*

*क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य अमाप आहे पण त्यांना कुठल्याही जाती धर्मात न पकडता कारण त्यांनी मुळात कोणती जात मानलीच नाही त्यामुळे त्यांना कोणत्या जाती धर्मात बांधण्याचा विषयच येत नाही. ही व्यक्तीच अशी आहे की ते होते म्हणून आम्ही आहोत सांगत त्यांना माझे विनम्र अभिवादन.*

*महेश काजळे --- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची 198 जयंती निमित्त दर वर्षी प्रमाणे ह्या वर्षी ही आमच ठरलंय आमच्या संघटनेच्या वतीने रथ यात्रा व बाईक रॅली आयोजन केले होते. आज ह्या रॅली साठी नागरी सामाजिक संस्था या बरोबर विविध सामाजिक संघटना व संस्था मार्फत जे आव्हान केले होते या आव्हानाला अनुसरून समस्त खोपोलीकरांनी ह्या रॅली मध्ये सहभाग घेतला सर्व प्रथम ह्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो.*

*क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले हे खऱ्या अर्थाने आपल्याला समजलेच नाहीत. त्यांचे कार्य हे खूप अमाप आहे ते शब्दामध्ये व्यक्त ही करता येणार नाही.*

*आताचे जे अदानी आणि अंबानी म्हणून आपण ओळखतो तर त्यावेळचे ते खऱ्या अर्थाने अदानी आणि अंबानी होते. त्यांनी त्यांची संपूर्ण संपती ही समाजकार्यासाठी वापरली.*

*पुण्यात असलेले खडकवासला धरण असेल. स्त्री शिक्षणाचे प्रणेते जनक म्हणून त्यांची ओळख आहे. याच बरोबर महिलांच्या केशवपण ह्याला विरोध केला बंदी घातली. तसेच विधवा पुनर्विवाह असे बरेच वेगवेगळे कार्य त्यांनी केले आहे.*

*त्यांच्या कार्याबद्दल बोलण्याचा खूप काही अभ्यास केला नाही पण त्यांच्या कार्याची त्यांनी लिहिलेल्या शेतकऱ्याचा आसूड, गुलामगिरी हे ग्रंथ खूप काही सांगून जातात.*

*श्री. छत्रपती शिवाजी महाराज ह्यांची समाधी शोधण्याचे काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी केले आणि संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून आपण श्री. छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या कडे पाहतो. डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी खऱ्या अर्थाने ज्यांना गुरु मानले ते महात्मा ज्योतिबा फुले आणि अश्या ह्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमीत सर्वांनी खूप सारी मेहनत घेतली सर्वांनी खोपोलीकरांनी जो उत्तम प्रतिसाद दिला त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचे आभार मानतो. याच बरोबर खोपोली पोलिस स्टेशन व खालापूर तहसील कार्यालय ह्यांनी परवानगी देऊन खूप मोठे सहकार्य केले. खोपोली नगर परिषदेने ही खूप मोठे सहकार्य केले त्या बद्दल ही त्यांचे मनापासून आभार मानतो.*

*विशेष सहकार्य - शाहिद शफी शेख, इरफान शफी शेख - मिरवणूक साठी रथ*

*सदर कार्यक्रमासाठी सर्व उपस्थित असलेल्यांची नावे न घेता समस्त खोपोलीकर महात्मा फुले अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.*

0
222 views